Optical Illusion: सगळ्यात खतरनाक ऑप्टिकल इल्यूजन, 99 टक्के लोक महिलेचा चेहरा शोधण्यात फेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 15:04 IST2023-05-08T14:59:40+5:302023-05-08T15:04:45+5:30
Optical Illusion : सामान्यपणे जवळपास सगळ्याच ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये एखादा प्राणी, एकादा शब्द किंवा अंक शोधायचा असतो. किंवा त्यातील चूक शोधायची असते. तसाच हा सुद्धा फोटो आहे.

Optical Illusion: सगळ्यात खतरनाक ऑप्टिकल इल्यूजन, 99 टक्के लोक महिलेचा चेहरा शोधण्यात फेल!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन डोळ्यांसमोर होणारा असा भ्रम आहे ज्यात तुम्ही बघता वेगळं आणि तुम्हाला दिसतं वेगळं. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहिले असतील, पण हा त्याहून फार अवघड आणि मजेदार आहे.
सामान्यपणे जवळपास सगळ्याच ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये एखादा प्राणी, एकादा शब्द किंवा अंक शोधायचा असतो. किंवा त्यातील चूक शोधायची असते. तसाच हा सुद्धा फोटो आहे. त्यात तुम्हाला एका महिलेचा चेहरा शोधायचा आहे. पण ते काही सोपं काम नाही.
या फोटोत तुम्हाला एका फुलावर बसलेलं फुलपाखरू दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या फुलावर एक रंगीबेरंगी फुलपाखरू बसलं आहे. यातच तुमचं ऑब्ज़र्वेशन आणि क्रिटिकल थिंकिंग टेस्ट केली जाणार आहे. यात तुमचा चांगलाच कस लागणार आहे.
या फुलामध्ये आणि फुलपाखरांमध्ये तुम्हाला एका महिलेचा चेहरा शोधायचा आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच तुम्ही हा चेहरा शोधू शकाल. यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाचा वेळ आहे.
तसा तर 7 सेकंदाचा वेळ फारच कमी आहे, पण यातच तुमचं स्कील जाणून घेण्याची संधी मिळेल. यातून मनोरंजन तर होईलच सोबतच तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा बघायला मिळेल. जर तुम्हाला अजूनही महिलेचा चेहरा दिसेला नसेल तर खाली उत्तर आहे.