१० सेकंदात शोधायचा आहे यात एक मासा, जास्तीत जास्त लोक झाले फेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 01:50 PM2024-06-11T13:50:21+5:302024-06-11T13:57:12+5:30
Optical Illusion : तुम्ही जर जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील मासा शोधू शकाल. यातील मासा शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. जे आपल्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. असे फोटो लोक एकमेकांना गेम चॅलेंज म्हणूनही शेअर करतात. यांमध्ये काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी दोन एकसारख्या दिसणाऱ्या फोटोंमध्ये फरक शोधायचा असतो. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या व्हायरल होत आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक हॉल दिसत आहे. ज्यात चार लहान मुले, एक सोफा, दोन झाडाच्या कुंड्या, एक डॉगी आणि भिंतीवर काही फ्रेम दिसत आहेत. एक टेबल, त्यावर दोन पॉटही दिसत आहेत. यातच तुम्हाला एक मासा शोधायचा आहे. हेच तुमचं आजचं चॅलेंज आहे. पण हे तुम्हाला वाटतं तेवढं सोपं काम नक्कीच नाही. कारण हा फोटो बघणारे अनेक लोक यातील मासा शोधण्यात फेल झाले आहेत.
पण तुम्ही जर जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील मासा शोधू शकाल. यातील मासा शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे. या वेळेतच तुम्हाला यातील मासा शोधून दाखवायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे सगळ्यांसाठी फायदे ठरतात. तुम्ही म्हणाला कसे? तर या फोटोमुळे आपल्या डोळ्यांची आणि मेंदुची चांगली कसरत होते. तसेच तुमची आयक्यू टेस्टही होते. त्यामुळेच एक्सपर्टही तुम्हाला असे फोटो सॉल्व करण्याचा सल्ला देतात. हे फोटो मनोरंजनही चांगलं करतात. अशात हे चॅलेंज नेहमीच व्हायरल होत असतात.
जर तुम्हाला या फोटोतील मासा १० सेकंदात सापडला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमची नजरही चांगली आहे. ज्यांना अजूनही यातील मासा दिसला नसेल त्यांनीही निराश होण्याचं कारण नाही. कारण तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.