तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा यातील साप!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 09:42 AM2023-05-27T09:42:43+5:302023-05-27T09:44:57+5:30
Optical Illusion : यामध्ये एका सापाला लपवण्यात आलं आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. जर तुम्ही त्याला शोधलं तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत.
Snake In Picture: तसे तर सापांचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच समोर येत असतात. ज्यात तुम्हाला कुठेना कुठे लपलेला साप शोधायचा असतो. असाच एक कन्फ्यूज करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात फोटोत तुम्हाला जंगलातील हिरवीगार झाडी दिसत आहेत. यामध्ये एका सापाला लपवण्यात आलं आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. जर तुम्ही त्याला शोधलं तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत.
अलिकडेच हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यावेळी असं सांगण्यात आलं की, या फोटोतील साप शोधणं वाटतं तेवढं सोपं काम नाही. कारण हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो इतर फोटोंपेक्षा वेगळा आहे. कारण या फोटोला रंगही सापाच्या रंगासारखा देण्यात आला आहे. असं म्हणता येईल की, सापाचा रंग या फोटोत दिसत असलेल्या हिरव्या रंगाच्या हिशोबाने सेट करण्यात आलाय.
या फोटोत काही झाडे दिसत आहेत. त्याशिवाय एक छोटासा तलाव दाखवण्यात आलाय. असं वाटत आहे की, तलावाजवळ एक छोटी बाग आहे. ज्यात लाकडाचे काही तुकडे ठेवले आहेत. जमिनीवर हिरवं गवत आहे. या सगळ्यांची बाब ही आहे की, हे सगळं एकाच हिरव्या रंगाचं आहे आणि यातच तुम्हाला साप शोधायचा आहे.
जाणून घ्या काय आहे उत्तर
जर तुम्ही अजूनही यातील साप शोधू शकले नसाल तर आम्ही तुम्हाला यात मदत करतो. बारकाईने बघाल तर उजवीकडे एक मोठं झाड आहे. त्या झाडाखाली पाण्यात इतर काही झाडे लागली आहेत. त्यातीलच जे पहिलं झाड आहे त्याला साप गुंडाळून बसला आहे. तलावाच्या मागे जे एक झाड आहे त्याच्या पाण्यातील झाडाच्या मधोमध साप बसला आहे. सापही हिरव्या रंगाचा आहे, त्यामुळे तो सहज दिसत नाही.