चॅलेंज! तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर 7 सेकंदात शोधा फोटोतील वेगळा नंबर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:47 PM2024-10-23T14:47:02+5:302024-10-23T14:48:56+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमध्ये समोरच जे असतं ते सहजपणे दिसत नाही.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आजकाल काही नवीन राहिलेले नाहीत. शेकडो ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंजही देत असतात. सगळ्यांनाच असे फोटो आवडतात, कारण यातील गोष्टी शोधण्यात एक वेगळीचे मज्जा येते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमध्ये समोरच जे असतं ते सहजपणे दिसत नाही. ते फोटो जरा बारकाईने बघून शोधावं लागतं. अनेकदा एकासारख्या अनेक गोष्टी समोर आल्यावरही कन्फ्यूजन होत असतं. ते यात आहे. यात तुम्हाला सगळीकडे 95 हा नंबर दिसत आहे. पण यात केवळ हाच नंबर नाही. यात 59 हा नंबर सुद्धा आहे. जो तुम्हाला 7 सेकंदात शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजन तर होतंच, सोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. कारण यातील गोष्टी शोधणं काही सोपं काम नसतं. त्यासाठी तुम्ही जीनिअस असायला हवेत आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण असायला हवेत. तेव्हाच तुम्हाला यात यश मिळतं.
जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत या फोटोतील 59 हा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा नंबर सर्कल केलेला आहे.