Optical Illusion : लहान मुलांच्या 'या' फोटोत लपला आहे खतरनाक साप, तुम्हाला दिसला का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 03:58 PM2022-10-18T15:58:49+5:302022-10-18T16:18:21+5:30
जर आम्ही काही सांगायच्या आतच जर तुम्हाला साप दिसला तर तुमच्या नजरेला मानावं लागेल. पण नसेल दिसला तर तुम्ही शोध मोहिम सुरू ठेवू शकता.
जंगलात फिरत असलेल्या लहान मुलांच्या या फोटोने लोक चक्रावून गेले आहेत. कारण या फोटोत मुलांसोबतच एक सापही आहे. पण हा साप अनेकांना दिसत नाहीये. जर आम्ही काही सांगायच्या आतच जर तुम्हाला साप दिसला तर तुमच्या नजरेला मानावं लागेल. पण नसेल दिसला तर तुम्ही शोध मोहिम सुरू ठेवू शकता.
हा फोटो ‘स्नेक कॅचर व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया’ या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. १४ ऑक्टोबरला हा फोटो शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत याला ३ हजारपेक्षा अधिक लाइक्स, ७९९ कमेंट्स आणि ७२६ शेअर मिळाले आहेत.
या फोटोसोबत एक पोस्ट असून त्यात लिहिले आहे की, 'मार्कने हा फोटो मला पाठवला. यात त्याची मुलगी तिच्या मित्रासोबत नॉर्थ इस्ट व्हिक्टोरियातील त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये फिरत होती. दरम्यान दोघांचही सापाकडे काहीच लक्ष नव्हतं. त्यांनाही सापाबाबत हा फोटो पाहूनच कळालं. दोघेही सहज पुढे निघून गेल्याने सापाने त्यांना काहीच केलं नाही'.
या फोटोत दिसणार साप फार विषारी आहे. या पोस्टच्या माध्यमातून सांगितले जात आहे की, जंगलात ट्रेकिंग करताना सांभाळून चला. जेणेकरून काही अनुचित घडू नये.