या कॉस्च्यूम पार्टीमध्ये लपला आहे एक चोर, 7 सेकंदात शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 12:13 PM2023-06-10T12:13:58+5:302023-06-10T12:17:20+5:30
Optical Illusion : काही असे फोटो असतात ज्यात लपलेला प्राणी शोधायचा असतो तर काहींमध्ये प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असा फोटो घेऊन आलोय ज्यात तुम्हाला एक चोर शोधायचा आहे.
Optical Illusion : आम्ही रोज तुमच्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल झालेले ऑप्टिकल इल्यूजन फोटो घेऊन येत असतो. ज्याने तुमचं मनोरंजन तर होतंच सोबतच तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि तुमच्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजतो. काही असे फोटो असतात ज्यात लपलेला प्राणी शोधायचा असतो तर काहींमध्ये प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असा फोटो घेऊन आलोय ज्यात तुम्हाला एक चोर शोधायचा आहे.
तुमच्यासमोर एक फोटो आहे ज्यात अनेक लोक दिसत आहेत. फोटो बघून असं वाटत आहे की, सगळे लोक एका कॉस्च्यूम पार्टीमध्ये आले आहेत. लोक वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. या लोकांमध्ये एक चोरही लपला आहे. तुम्हाला याच चोराला शोधायचं आहे.
यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाचा वेळ आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच चोर शोधू शकाल. पण जर तुम्ही चॅलेंज पूर्ण करू शकत नसाल तर निराश होऊ नका. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो.
फोटोमध्ये चोर एकदम तुमच्या डोळ्यांसमोर आहे. पण तो चोरी इतक्या शांतपणे करत आहे की, भलेभले लोक त्याला पकडू शकत नाहीयेत. चला आम्ही सांगतो चोर कुठे आहे. फोटोत तुम्हाला एक व्यक्ती निन्जा ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याच्यामागे एक मुलगी उभी आहे. ती मुलगी त्याच्या खिशातून काहीतरी चोरी करत आहे.