घुबडाच्या 'या' फोटोत आहेत ३ फरक, भलेभले शोधून थकले; तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 03:16 PM2024-08-07T15:16:14+5:302024-08-07T15:26:00+5:30
Optical Illusion : आम्ही जो फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ १२ सेकंदाची वेळ आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो मनोरंजनासोबतच मेंदू आणि डोळ्यांची कसरतही करतात. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. ज्या लोकांचे डोळे तीक्ष्ण असतात असेच लोक या फोटोंमधील गोष्टी सॉल्व करू शकतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही फोटोंमध्ये तुम्हाला प्राणी शोधायचे असतात तर कधी यात तुम्हाला वेगळे नंबर तर कधी काही वस्तू शोधायच्या असतात. आम्ही जो फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ १२ सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एकासारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत एक घुबड झाड्याच्या फांदीवर बसलेलं दिसत आहे. मागे काही दगडांचे डोंगर, खाली झाडांना फुले लागलेली दिसत आहेत. फोटो एकसारखे दिसत असले तरी ते एकसारखे नाहीत. त्यांमध्ये तीन फरक आहेत. ते काय आहेत हे शोधण्याचं तुम्हाला चॅलेंज आहे.
हे चॅलेंज पूर्ण करणं वाटतं तेवढं सोपं अजिबात नाही. हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला नक्कीच लवकरच यातील फरक दिसून येतील.
जर तुम्हाला फोटोतील फरक दिलेल्या वेळेत दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. तुमचं अभिनंदन. जर अजूनही दिसले नसतील निराश होण्याचंही काही कारण नाही. कारण यातील फरक शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही फोटोतील फरक बघू शकता.
वरच्या फोटोत फोटोतील तीन फरक सर्कल केलेले आहेत.