Optical Illusion: या फोटोत लपले आहेत तीन जीव, समोरच आहेत पण शोधणं नाही सोपं काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 11:34 AM2022-08-15T11:34:16+5:302022-08-15T11:36:56+5:30
Optical Illusion : एका फोटोकडे बघून दोन लोक वेगवेगळं ऑब्जर्वेशन करू शकतात. जे पूर्णपणे त्यांच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असतं. हा जो ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही घेऊन आलो आहोत तो तुमच्या ऑब्जर्वेशन स्किलला आव्हान देणारा आहे.
Optical Illusion Find A Frog: ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात आणि डोकं चक्रावून सोडतात. कारण यात जे दिसतं ते नसतं. आश्चर्याची बाब म्हणजे यातील रहस्य किंवा प्रश्नांची उत्तरं शोधणंही फार अवघड असतं. अनेकजण तासंतास या फोटोंकडे बघत बसतात, पण त्यांना काही उत्तर सापडत नाही. तर काही लोक लगेच यातील रहस्य उलगडून सांगतात. सोशल मीडियावर अलिकडे असे शेकडो फोटो व्हायरल होत असतात आणि लोक ते शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात.
फोटोत लपले आहेत तीन जीव
एका फोटोकडे बघून दोन लोक वेगवेगळं ऑब्जर्वेशन करू शकतात. जे पूर्णपणे त्यांच्या पर्सनॅलिटीवर अवलंबून असतं. हा जो ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही घेऊन आलो आहोत तो तुमच्या ऑब्जर्वेशन स्किलला आव्हान देणारा आहे. हा फोटो अर्बन एम्ब्रोजिक आणि ग्रेगोरी प्लांटर्ड यांनी काढला होता. यात तुम्हाला पनामाच्या जंगलात जमिनीवर काही पाने पडलेली दिसतात. पण जर तुम्हाला यात फक्त पाने दिसत असतील तर तुम्ही फसत आहात. कारण या फोटोत तीन बेडूक लपले आहेत.
तुम्हाला या फोटोतील हेच बेडूक शोधून काढायचे आहेत. पण त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असली पाहिजे आणि डोकं शांत असलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या नजरेची टेस्ट घेण्याची ही चांगली संधी आहे. एक काम करा तुमच्या मोबाइलमध्ये टायमर लावा आणि 7 सेकंदात यातील तीन बेडूक शोधून दाखवा.
जर तुम्हाला तीन बेडूक दिसले असतील तर तुमच्याकडे हाय आयक्यू आणि चांगलं ऑब्जर्वेशन आहे. तुमची नजरही तीक्ष्ण आहे. पण बरेच लोक यातील बेडूक शोधू शकत नाहीयेत. बेडूक समोरच आहेत, पण तरीही त्यांना ते शोधणं जमत नाहीये किंवा अवघड जात आहे. बघा तुम्हाला तरी दिसतात का.