Optical Illusion : तीक्ष्ण डोळे असलेलेच या बर्फाळ डोंगरावर लपवलेली कार शोधू शकतील, 15 सेकंद आहे वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 04:40 PM2023-04-24T16:40:29+5:302023-04-24T16:54:14+5:30
Optical Illusion : सोशल साइट Pinterest वर असाच एक भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात एका बर्फाळ डोंगरावर बरीच लहान मुले खेळताना दिसत आहेत.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील रहस्य शोधण्याचा उद्देश केवळ टाइमपास किंवा मनोरंजन नसतो. तर याने तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि तुमची तार्किक क्षमताही समजून येते. याने डोळ्यांची आणि तुमच्या मेंदुची देखील टेस्ट होते. जर तुमच्याकडे नजर असेल आणि डोकं शांत असेल तुम्ही अशा फोटोमधील रहस्य सहजपणे उलगडू शकता.
सोशल साइट Pinterest वर असाच एक भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात एका बर्फाळ डोंगरावर बरीच लहान मुले खेळताना दिसत आहेत. पण या मुलांमध्ये एक कारही आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. ज्यासाठी तुमच्यासाठी केवळ 15 सेकंदाचा वेळ आहे. समस्या ही आहे की, अनेकांना बराचवेळ देऊनही यातील कार सापडत नाहीये. कारण ती कारण शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असायला हवी. तेव्हा तुम्हाला यातील कार दिसू शकेल.
एखाद्या व्यक्तीची तार्किक क्षमता आणि समस्या सॉल्व्ह करण्याची क्षमता जाणून घेण्यासाठी ब्रेन टीजर किंवा ऑप्टिकल भ्रमसारखे चॅलेंज सगळ्यात मजेदार आणि रोमांचक मानले जातात. तसंच इथे आहे. या फोटोत खेळत्या मुलांच्या मधे एक कार आहे. जी तुम्हाला शोधायची आहे.
तुम्ही बघू शकता की, बर्फासोबतच फोटोत काही झाडं दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला लहान मुले खेळत आहेत. पण सगळ्यांमध्ये तुम्हाला कार दिसली का? जर अजूनही दिसली नसेल तर बारकाईने बघा. मदत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोटोत खरीखुरी कार नाही तर ती आकृतीच्या रूपात आहे. जर अजूनही कार दिसली नसेल तर झाडांच्या खोडावरील वाकड्या-तिकड्या रेषांकडे बघा. अजूनही कार दिसली नसेल तर खालच्या फोटोत उत्तर आहे.