जास्तीत जास्त लोक 'या' फोटोतील 672 नंबर शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 01:39 PM2024-08-10T13:39:53+5:302024-08-10T14:07:49+5:30

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे 67Z असे दोन अंक आणि एक अक्षर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबर आहे तो म्हणजे 672.

Optical Illusion Challenge: Find the Number 672 along with 67Z in 15 Seconds | जास्तीत जास्त लोक 'या' फोटोतील 672 नंबर शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हीही ट्राय करा!

जास्तीत जास्त लोक 'या' फोटोतील 672 नंबर शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतात. या फोटोतील गोष्टी शोधणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगल्या असतात असं अनेक मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. ज्यामुळे यात लपवण्यात आलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाही. त्या शोधाव्या लागतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक नंबर शोधायचा आहे.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे 67Z असे दोन अंक आणि एक अक्षर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबर आहे तो म्हणजे 672. हा नंबर शोधण्याचं तुमच्यासाठी चॅलेंज आहे. महत्वाची बाब म्हणजे हा नंबर तुम्हाला 15 सेकंदात शोधायचा आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर नक्कीच तुम्ही हा नंबर ठरलेल्या वेळेत शोधू शकाल.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे यात जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला शोधावं लागतं. सगळ्यात चांगली बाब म्हणजे यातील नंबर शोधताना तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. म्हणूनच असे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. 

जर तुम्हाला या फोटोतील 672 हा नंबर 15 सेकंदात दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर नसेल तर निराश होण्याचंही कारण नाही. कारण यातील हा नंबर कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा नंबर बघू शकता.

वरच्या फोटोत तुम्ही हा वेगळा नंबर सर्कल केलेला बघू शकता.

Web Title: Optical Illusion Challenge: Find the Number 672 along with 67Z in 15 Seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.