डॉगी आणि मुलाच्या फोटोत आहेत ३ फरक, १५ सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:46 PM2024-07-03T12:46:53+5:302024-07-03T12:49:09+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी सॉल्व करताना मेंदुची चांगली कसरत होते आणि तुमचं मनोरंजनही होतं. तुमच्यासाठी आणलेल्या फोटोत तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.
Optical Illusion : तुम्हाला जर सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंज, गेम्स, पझल्स सॉल्व करण्याची आवड असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज घेऊन आलो आहोत. ऑप्टिकल इल्यूजन फोटोमधील गोष्टी सॉल्व करताना मेंदुची चांगली कसरत होते आणि तुमचं मनोरंजनही होतं. तुमच्यासाठी आणलेल्या फोटोत तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक मुलगा एका डॉगीचे दात घासून देत असल्याचं दिसत आहे. ब्रशच्या मदतीने तो डॉगीचे दात स्वच्छ करत आहे. दोन्ही फोटो सुरूवातीला पाहिल्यावर एकसारखे दिसतात. पण मुळात फोटो एकसारखे नाहीत. त्यात तीन फरक आहे. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीत यातील तीन फरक १५ सेकंदात शोधू शकाल.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला कधी काही वस्तू शोधायच्या असतात कधी तुम्हाला वेगळे नंबर शोधायचे असतात तर कधी तुम्हाला त्यात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे.
जर तुम्हाला १५ सेकंदात फोटोतील तीन फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण अजूनही फरक दिसले नसतील निराशही होऊ नका. कारण हे फरक काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हे फरक बघू शकता.
एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील फरक सर्कल केले आहेत.