एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये शोधायचे आहेत 5 फरक, 30 सेंकदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 09:44 AM2023-05-09T09:44:21+5:302023-05-09T09:47:28+5:30
Optical Illusion : काही लोक हे चॅलेंज सॉल्व करू शकतात तर काही नाही. पण तरीही यात एक वेगळीच गंमत असते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Optical Illusion : सध्या ऑप्टिकल इल्यूजन आणि दोन सारख्या दिसणाऱ्या फोटोंमधील अंतर शोधण्याच्या चॅलेंजची चांगलीच क्रेझ आहे. केवळ लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही याची आवड आहे. कारण यात डोळ्यांसोबतच मेंदुचीही एक्सरसाइज होते. काही लोक हे चॅलेंज सॉल्व करू शकतात तर काही नाही. पण तरीही यात एक वेगळीच गंमत असते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये तुम्हाला 5 फरक शोधायचे आहेत. एकसारख्या दिसणाऱ्या या 2 फोटोंमधील 5 फरक शोधण्यासाठी तुमच्याकडे 30 सेकंदाचा वेळ आहे. यातून तुम्हाला मिळणार काही नाही, पण तुमच्या डोळ्यांची आणि बुद्धीची टेस्ट नक्कीच होईल. तसेच तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही कळेल.
यात तुमच्या ऑब्जर्वेशन स्किलची टेस्ट होणार आहे. स्पोर्ट डिफरन्स नावाच्या या खेळामध्ये मेंदुची चांगलीच कसरत होते आणि टाइम पासच्या माध्यमातून ऑब्जर्वेशन स्किलही परफेक्ट होतं. जर तुम्हाला यात 5 फरक दिसत असतील तर लगेच सॉल्व करा.
बारकाईने फोटो पाहिला तर तुम्हाला यातील फरक दिसून येईल. या फोटोत तुम्हाला दोन डॉगी दिसत आहेत. जे खाली गोलाकार पांढऱ्या-निळ्या कार्पेटवर बसले आहेत. त्यांच्या मागे एक टेबल आहे. खाली एक बॉल आहे. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात, पण यात फरक आहे. तेच तुम्हाला शोधायचे आहेत. जर 30 सेकंदात तुम्ही यातील फरक शोधू शकले नाही तर खाली उत्तर आहेच.