Optical Illusion : शेतातील 'या' फोटोत शोधा ५ चुका, १५ सेकंदाची आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 01:17 PM2024-06-15T13:17:46+5:302024-06-15T13:29:11+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चुका शोधायच्या आहेत.
Optical Illusion : सोशल मीडियावर मेंदू आणि डोळ्यांची कसरत करणारे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. अनेक एक्सपर्ट सांगतात की, अशा फोटोंमुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. ऑप्टिकल इल्यूजन फोटो वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही फोटोंमध्ये तुम्हाला गोष्टी शोधायच्या असतात तर काही फोटोंमध्ये तुम्हाला फरक शोधायचे असतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चुका शोधायच्या आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे फार मजेदार आणि मनोरंजक असतात. जे सॉल्व करण्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मजा येते. सोशल मीडियावर अनेक अनावश्यक गोष्टी बघण्यापेक्षा हे कधीही चांगले. कारण याने मेंदू आणि डोळ्यांची कसरत होते. या फोटोत तुम्हाला ५ चुका शोधायच्या आहेत. त्यासाठी तुमच्याकडे १५ सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक शेत दिसत आहे. त्यात एक पुरूष आणि एक महिला दिसत आहे. महिला शेतात काम करत आहे. झाडांना स्प्रे ने पाणी देत आहे. पण या फोटोत पाच चुका आहेत ज्या तुम्हाला शोधायच्या आहेत. अर्थात हे काही सोपं काम नाही. या चुका शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असायला हवी. तरच तुम्हाला यात यश मिळेल.
जर तुम्हाला १५ सेकंदात यातील पाच चुका दिसल्या असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही यातील चुका दिसल्या नसतील तर निराश होऊ नका. त्या शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही त्या बघू शकता.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे लोक चॅलेंज म्हणून नेहमीच एकमेकांना शेअर करत असतात. कारण यातून चांगला टाइमपास तर होतोच सोबतच मेंदुची कसरतही होते.