फोटोतील एक माकड आहे वेगळं, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:39 IST2024-04-15T13:37:35+5:302024-04-15T13:39:09+5:30
Optical Illusion : असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक फरक शोधायचा आहे.

फोटोतील एक माकड आहे वेगळं, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ब्रेन टीजर आणि ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. अशा फोटोंमध्ये विचारलेले प्रश्न किंवा त्यातील चुका शोधण्यात लोकांना आवडतं. म्हणून लहान मुलांसोबतच मोठे लोक देखीलही अशा फोटोंवर बराच वेळ घालवतात. कारण यातून मेंदुची कसरतही होते आणि तुमचं मनोरंजनही चांगलं होतं. याने मेंदुला चालनाही मिळते आणि डोळ्यांची टेस्टही होते.
असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक फरक शोधायचा आहे. जर तुमच्याकडे ऑब्ज़र्वेशन स्किल असेल तर तुम्ही या फोटोतील रहस्य सॉल्व करू शकता. या फोटोत तुम्हाला काही एकसारखे माकड दिसत आहेत. पण या माकडांमध्ये एक वेगळं माकड आहे. तेच तुम्हाला शोधायचं आहे. तेही केवळ 7 सेकंदात.
फोटोत सगळी माकडं एकसारखी पोज देऊन बसली आहेत. सगळे एका लाइनमध्ये बसले आहेत. सगळ्यांचे चेहरे एकसारखे दिसत आहेत. पण यातील एक माकड जरा वेगळं आहे. यातील कोणत्या माकडाचा चेहरा वेगळा आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. तेही केवळ 7 सेकंदात.
आम्ही त्याला शोधण्यासाठी एक हिंट देतो. या माकडाचा चेहरा इतरांपेक्षा वेगळा आहे. कारण त्याने थोडं वेगळं मेकअप केलं आहे. जर तुम्हाला ते माकड अजूनही सापडलं नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत ते तुम्ही बघू शकता.