Optical illusion: फोटोत लपलाय एक बेडूक, फक्त 10 टक्के लोक शोधू शकले, तुम्हीही ट्राय करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 06:38 PM2022-08-08T18:38:53+5:302022-08-08T18:41:08+5:30
Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोला तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचे एक उदाहरण मानू शकता. तुम्ही बारकाईने बघाल तरच तुम्हाला फोटोतील बेडूक दिसेल.
Optical Illusion: मित्रांनो…तुम्ही एका नवीन ऑप्टिकल इल्यूजन टेस्टसाठी तयार आहात का? हा फोटो पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. यात भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात. हे फोटो पाहिल्यावर लोक कन्फ्यूज होतात. त्यातील गुपित शोधत शोधत लोक थकतात, पण काही मोजकेच लोक त्यातील रहस्य उलगडू शकतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे.
ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या ऑब्जर्वेशन स्किलची चाचणी घेतो. याशिवाय अशा फोटोंमधून व्यक्तीची मानसिक क्षमता तपासली जाते. तुम्ही तयार आहात का अशाच ऑब्जर्वेशन टेस्टसाठी...आजचे ऑप्टिकल इल्यूजन तुम्हाला विचार करायला लावणार आहे. वरील फोटोमध्ये तुम्हाला हिरवेगार जिंगल दिसत आहे. याच जंगलात एक बेडूक लपून बसला आहे, तुम्हाला 10 सेकंदाच्या आत हा बेडूक शोधायचा आहे.
बऱ्याचदा गोष्टी आपल्या समोरच असतात, पण त्या सहजपणे दिसत नाहीत. त्यासाठी बारकाईने आणि डोकं शांत ठेवून त्यांचा शोध घ्यावा लागतो. या फोटोत लपलेल्या बेडकाला शोधणं काही सोपं काम नाहीये. यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूवर जोर द्यावा लागले. आतापर्यंत तुम्ही बेडूक शोधला असेलच. पण, जर तुम्ही बेडूक शोधला नसेल तर तुमचे ऑब्जर्वेशन कच्चे आहे. बराच वेळ शोधूनही बेडूक सापडत नसेल तर चिंता करू नका, आम्ही तुम्हाला हा बेडूक दाखवू. बेडूक पाहण्यासाठी खालील फोटो पाहा...