Optical Illusion: नजरेचा खेळ! बघुयात तुमची नजर किती तीक्ष्ण, 'या' चित्रातली मांजर शोधून दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 04:27 PM2022-07-22T16:27:00+5:302022-07-22T16:27:08+5:30
इंटरनेटवर मेंदुला ताण देणाऱ्या अनेक ऑप्टिकल इल्यूजनची कोडी व्हायरल होत असतात. काही कोडी तर अक्षरश: डोक्याचा भुगा करतात. यूझर्स देखील अशी चित्रकोडी पाहून ती सोडवण्यासाठी प्रयत्न करतात
इंटरनेटवर मेंदुला ताण देणाऱ्या अनेक ऑप्टिकल इल्यूजनची कोडी व्हायरल होत असतात. काही कोडी तर अक्षरश: डोक्याचा भुगा करतात. यूझर्स देखील अशी चित्रकोडी पाहून ती सोडवण्यासाठी प्रयत्न करतात आणि तासनतास घालवतात. तर काही कोडी अगदी काही सेकंदात सुटतात. आता कोडी सोडवणं म्हणजे हा प्रत्येकाच्या क्षमतेचा विषय असतो. आता असंच एक भन्नाट चित्रकोडं सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
चित्रात दडलेली एखादी गोष्ट शोधायची असली की तुमच्या नजरेची परीक्षाच ठरते. यात तुमच्या एकाग्रतेचीही कसोटी लागते. आता हेच चित्र पाहा यात एक मांजर दडलेली आहे आणि ती शोधण्याचं टास्क देण्यात आलं आहे. चित्र एका घरासमोरील अंगणाचं दिसतंय. चित्रात एक मांजर दडलेली असल्याचा दावा करण्यात आला आहे आणि तिच शोधून काढणं हेच आव्हान आहे. @Thereisnocat_ नावाच्या युजरने ट्विटरवर हे छायाचित्र शेअर केले आहे. त्यास साडेसहा हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर हजारो कमेंट्स आल्या आहेत.
— There is no cat in this image (@Thereisnocat_) June 17, 2022
अनेकांनी खूप प्रयत्न केले पण या चित्रातली मांजर काही सापडलेली नाही. त्यामुळे काही युझर्सनं माघार देखील घेतली. "ही काही आपल्याला जमणार नाही. मी पराभव स्वीकारतो', असं एका युझरनं म्हटलं आहे. तर एकानं 'सामान्यत: मी अशी कोडी पटकन सोडवतो पण हे खरोखर खूप कठीण आहे', असं म्हटलं आहे.
उत्तर काय?
आता तुम्हीही शोधून शोधून वैतागले असाल तर मांजर कुठे आहे सांगून टाकुयात. चित्राच्या मध्यभागी जे गार्डनिंग व्हेइकल दिसतंय ते जर झूम करुन पाहिलं तर त्यामागे लपलेल्या मांजरीची पांढऱ्या आणि काळ्या रंगाची शेपटी दिसेल. इथंच मांजर लपली आहे.