केवळ जीनिअस लोकच 10 सेकंदात शोधू शकतील फोटोतील वेगळा नंबर, बघा तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 01:20 PM2024-08-13T13:20:20+5:302024-08-13T13:50:24+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला वेगळा नंबर शोधायचा आहे. यात फोटोत तुम्हाला सगळीकडे 775 नंबर दिसत आहे. यातच एक वेगळा नंबर लपवण्यात आला आहे.
Optical Illusion : जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही. तर तुम्ही ऑप्टिकल इल्यूजन फोटो किंवा वेगवेगळे पझल्स असलेले फोटो सॉल्व करू शकता. सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. लोक असे फोटो शेअर करून एकमेकांना चॅलेंज देत असतात. असाच एका फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. काही फोटोंमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर काही फोटोंमध्ये वेगळे नंबर तर कधी काही फरक शोधायचे असतात. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला वेगळा नंबर शोधायचा आहे. यात फोटोत तुम्हाला सगळीकडे 775 नंबर दिसत आहे. यातच एक वेगळा नंबर लपवण्यात आला आहे. हा नंबर म्हणजे 725 हा आहे. हाच तुम्हाला शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे मेंदू आणि डोळ्यांची कसरत करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. सोबतच या फोटोंच्या माध्यमातून तुमचं चांगलं मनोरंजनही होतं. त्यामुळेच असे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. पण यातील गोष्टी शोधण्याचं काम काही सोपं नाही. यातील गोष्टी शोधण्यासाठी तुमचे डोळे तीक्ष्ण असण्याची गरज आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तर लगेच लागा कामाला.
जर तुम्ही 10 सेकंदात या फोटोतील वेगळा नंबर शोधला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा नंबर बघू शकता.
फोटोतील वेगळा नंबर वरच्या फोटोत सर्कल केला आहे.