Optical Illusion: या फोटोमध्ये बिबट्याला शोधुन दाखवा, जिनिअस असाल तरच सापडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 10:48 AM2022-06-06T10:48:51+5:302022-06-06T10:52:40+5:30
यात बिबट्याचा फोटो शोधुन दाखवण्याचं चॅलेंज दिलं आहे. यातून तुमचा मेंदू (Brain) किती कार्यक्षम आणि विकसित आहे, हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे
इंटरनेटवर (Internet) अनेक फोटोज, पेटिंग व्हायरल होत असतात. त्यापैकी वैशिष्ट्यपूर्ण फोटोज, पेटिंग्ज यूजर्स शेअर करत असतात. अलीकडे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) हा नवा प्रकार इंटरनेटवर जोरदार व्हायरल (Viral) होताना दिसतो. काही विशिष्ट फोटो किंवा पेटिंगमध्ये ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार वापरला जातो. डोळ्यांपुढे काहीसा संभ्रम निर्माण करणाऱ्या फोटो किंवा पेटिंगच्या अनुषंगाने काही प्रश्नांची उत्तरं विचारली जातात. यामागे मनोरंजनासह विचारांना चालना देणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो इंटरनेट व्हायरल होत आहे. यात बिबट्याचा फोटो शोधुन दाखवण्याचं चॅलेंज दिलं आहे. यातून तुमचा मेंदू (Brain) किती कार्यक्षम आणि विकसित आहे, हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे. `टाइम्स नाऊ न्यूज`ने याविषयीची माहिती दिली आहे.
इंटरनेटवर सध्या अनेक फोटोंमध्ये साप, खारुताई अथवा मांजर शोधा, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करा आणि प्राणी शोधण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो, यावर लक्ष ठेवा असं सांगितलं जात आहे. हा फोटो बारकाईनं पाहिल्यास दगडांच्यामध्ये असलेला बिबट्या आहे. यासाठी एक हिंट अशी की या फोटोच्या खालच्या अर्ध्या भागावर लक्ष केंद्रित करा.
ऑप्टिकल इल्युजन म्हणजे काय?
ऑप्टिकल इल्युजन हे केवळ आकार बदलणाऱ्या प्रतिमा आणि संभ्रम निर्माण करणारे रंग यांचा समावेश असलेले केवळ गूढ ब्रेन टीझर (Brain Teaser) नाहीत. यातून दृष्टी परिक्षणाच्या माध्यमातून तुमचा मेंदू कसा कार्य करतो, याविषयी बरंच काही सांगता येतं. मेंदूच्या डावा भाग अधिक वापरणाऱ्या व्यक्ती या अंतर्ज्ञानी, जिज्ञासू असलेल्या मेंदूचा उजवा भाग अधिक वापरणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक विश्लेषणात्मक आणि तार्किक विचार करणाऱ्या असतात. तथापि, अॅबस्ट्रॅक्ट इमेजेसचा (Abstract Images) तुम्ही जो अर्थ लावलेला असतो, त्यावर आधारित माहितीचं परिणामकारक रिव्हर्स इंजिनीअरिंग करण्याचं काम म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. आपण एखादा फोटो किंवा पेटिंग कसं पाहतो यावरून आपल्या मेंदूची आणि व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्य स्पष्ट होत असतात. त्यामुळे ही गोष्ट खरोखरच मनोरंजक ठरते. तुमच्याकडे अधिक विश्लेषणात्मक मेंदू आहे की तुलनेनं सर्जनशील मन आहे, हे निष्कर्ष तुमच्या मेंदूवर कोणत्या हेमिस्फेअरचं वर्चस्व असतं यावरून ठरवता येऊ शकतं. ‘द माइंड्स जर्नल’च्या मते, तुमच्या मेंदूचा उजवा अर्धा भाग सरासरीपेक्षा अधिक विकसित आहे, पूर्ण विकसित आहे, हळूहळू कार्य करतो की नाही या गोष्टी तुम्ही विशिष्ट ऑप्टिकल इल्युजन पाहून जाणून घेऊ शकता.