एकासारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहेत 5 फरक, 12 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:29 PM2023-12-01T12:29:15+5:302023-12-01T12:33:23+5:30

Optical Illusion : अनेकदा गोष्टी आपल्या डोळ्यांसमोरच असतात तरीही आपण त्यांना बघू शकत नाहीत किंवा एखादा फोटो पाहून तो समजणंही अवघड असतं.

Optical illusion : Find out 5 differences in these pictures within 12 seconds | एकासारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहेत 5 फरक, 12 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

एकासारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहेत 5 फरक, 12 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून तुमच्या मेंदुची कसरत होते. सोबतच तुमच्या डोळ्यांची टेस्टही होते. या फोटोंमध्ये कधी लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी दोन सारख्या दिसणाऱ्या फोटोंमध्ये फरक शोधायचा असतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

अनेकदा गोष्टी आपल्या डोळ्यांसमोरच असतात तरीही आपण त्यांना बघू शकत नाहीत किंवा एखादा फोटो पाहून तो समजणंही अवघड असतं. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होतात आणि आपण तासंतास त्यातील पझल सॉल्व करण्यात घालवतो. ऑप्टिकल इल्यूजनच्या या सीरीजमध्ये आम्ही तुमच्यासाठी दोन फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात 5 फरक आहेत. जे तुम्हाला शोधायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजनचे हे दोन्ही फोटो एकसारखेच दिसतात. ज्यात एका क्लासरूममध्ये टीचर 5 विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. पहिल्या बेंचवर 3 आणि दुसऱ्या बेंचवर 2 बसले आहेत. एकसारख्या दिसणाऱ्या या फोटोत 5 फरक आहेत. जे शोधण्यासाठी तुमच्याकडे 12 सेकंदाची वेळ आहे.

या फोटोतील फरक शोधण्यासाठी तुमचं ऑब्जर्वेशन स्किल फार चांगलं असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला 12 सेकंदात यातील 5 फरक दिसू शकतील. जर तुम्हाला फरक दिसले असतील तर तुमचं ऑब्जर्वेशन स्किल चांगलं आहे. जर अजूनही फरक दिसले नसतील तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत ते बघू शकता.

Web Title: Optical illusion : Find out 5 differences in these pictures within 12 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.