Optical Illusion: या फोटोत एक-दोन नाही तर शोधायच्या आहेत 7 गोष्टी, केवळ 2 टक्के लोकच शोधू शकले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:45 PM2022-09-12T12:45:05+5:302022-09-12T12:49:25+5:30

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला एक किंवा दोन नाही तर सात गोष्टी शोधायच्या आहेत. यावेळी तुमच्यासाठी हा फोटो मोठं चॅलेंज ठरणार आहे. कारण तुम्हाला या फोटोतील गोष्टी केवळ 15 सेकंदात शोधायच्या आहेत. 

Optical illusion : Find seven hidden things only in 15 seconds, can you found | Optical Illusion: या फोटोत एक-दोन नाही तर शोधायच्या आहेत 7 गोष्टी, केवळ 2 टक्के लोकच शोधू शकले!

Optical Illusion: या फोटोत एक-दोन नाही तर शोधायच्या आहेत 7 गोष्टी, केवळ 2 टक्के लोकच शोधू शकले!

Next

Optical Illusion Spot: तुम्ही अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन पाहिले असतील, पण काही फोटो असे काही भ्रम निर्माण करतात की, बघून डोकं चक्रावून जातं. काही असे फोटो असतात ज्यात फक्त एक किंवा दोन गोष्टी शोधायच्या असतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत जो बघून तुम्ही विचारात पडाल. या फोटोत तुम्हाला एक किंवा दोन नाही तर सात गोष्टी शोधायच्या आहेत. यावेळी तुमच्यासाठी हा फोटो मोठं चॅलेंज ठरणार आहे. कारण तुम्हाला या फोटोतील गोष्टी केवळ 15 सेकंदात शोधायच्या आहेत. 

जर तुम्हाला या फोटोतील 7 गोष्टी 15 सेकंदात दिसल्या असतील तर तुम्ही अशा फार कमी लोकांमध्ये आहात ज्यांना हे जमलं. जर तुम्हाला केवळ 15 सेकंदात जर यातील गोष्टी दिसत नसतील तर तुम्ही जास्तही वेळ घेऊ शकता. ही फक्त तुमच्या मेंदूची आणि डोळ्यांची टेस्ट आहे. जर तुम्हाला यातील गोष्टी सापडत नसतील तर आम्ही काही हिंट देतो. एका बागेत ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्केच आहे. जिथे एक खारूताई खेळत आहे. एक पक्षी झाडाच्या फांदीवर बसला आहे. यात इल्यूजन आपल्याला खूपसारी झाडांची पाने, प्राणी आणि गवत दिसतं आणि 7 गोष्टी ज्या लपल्या आहेत.

या इल्यूजनमधील लपलेल्या गोष्टी शोधणं तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. हा दावा करण्यात आला आहे की, केवळ 2 टक्के लोक यातील लपलेल्या गोष्टी शोधू शकले आहेत. जर तुम्हाला या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधण्यास अडचण येत असेल तर त्या शोधण्यासाठी एक आयडिया आहे. एका झाडावर खारूताई खेळत आहे, यावरून हे दिसून येतं की, तुमची नजर किती तीक्ष्ण आहे. जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही यातील लपलेल्या गोष्टी दिसत नसतील तर काही हिंट देतो. यात मासा, ट्यूलिप, आयइस्क्रीम, बॉल, कलर पेन्सिल, चमचा आणि चंद्र शोधायचा आहे.

Web Title: Optical illusion : Find seven hidden things only in 15 seconds, can you found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.