चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील 1018 हा वेगळा नंबर, अनेकजण शोधून थकले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 03:19 PM2024-08-05T15:19:34+5:302024-08-05T15:33:28+5:30
Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. त्यामुळे त्यातील गोष्टी शोधण्यात खूप मेहनत घ्यावी लागते.
Optical Illusion: सामान्यपणे कुणाला कंटाळा आला किंवा रिकामा वेळ असला तर बरेच लोक सोशल मीडियावर व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघतात आणि ते त्यातील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. त्यामुळे त्यातील गोष्टी शोधण्यात खूप मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला असून त्यात तुम्हाला 1018 हा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजनच्या विशाल समुद्रातून आम्ही तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आलो आहोत. याने तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन किंवा विचार करण्याच्या क्षमतेला नवं वळण मिळेल. तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला सगळीकडे 1818 हा नंबर दिसत आहे. त्यातच तुम्हाला 1018 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही फोटोंमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात, कधी यात काही प्राणी शोधायचे असतात तर कधी वेगळे नंबर शोधायचे असतात. या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळेच असे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. लोक असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून एकमेकांना चॅलेंजही देत असतात.
जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर नक्कीच तुम्हाला सहजपणे फोटोतील वेगळा नंबर दिसून येईल. जर 10 सेकंदात तुम्हाला फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण तो वेगळा नंबर काय आहे आणि कुठे आहे ते आम्ही सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो नंबर बघू शकता.
फोटोतील वेगळा नंबर सर्कलमध्ये बघू शकता.