केवळ जीनिअस लोकच ७ सेकंदात शोधू शकतील फोटोतील वेगळं अक्षर, बघा तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 02:29 PM2024-10-04T14:29:03+5:302024-10-04T14:29:58+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला सगळीकडे H हे इंग्रजी अक्षर दिसत आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर रोजच व्हायरल होत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या फोटोंमधील गोष्टी शोधणं सगळ्यांनाच आवडतं. कारण यातून आपलं मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांचा व्यायामही होतो. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला इंग्रजीचं एक वेगळं अक्षर शोधायचं आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये काही चुका, कधी प्राणी किंवा वस्तू, तर कधी दोन फोटोंमधील फरक शोधायचे असतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला सगळीकडे H हे इंग्रजी अक्षर दिसत आहे. पण यात केवळ H नाही तर आणखी एक वेगळं अक्षर आहे. ते म्हणजे N. जे तुम्हाला ७ सेकंदात शोधून काढायचं आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे कन्फ्यूज करणारे असतात. त्यात जेव्हा फोटोत एकसारख्या दिसणाऱ्या अनेक गोष्टी असतात तेव्हा तर अजूनही कन्फ्यूजन व्हायला होतं. तसंच काहीसं या फोटोबाबत आहे. पण तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करायचं असेल तर जरा मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही फोटो बारकाईने पाहिलं तर तुम्हाला यात नक्कीच यश मिळेल.
जर ठरलेल्या वेळेत म्हणजे ७ सेकंदात तुम्हाला या फोटोतील वेगळं अक्षर सापडलं असेल तर तुमचं अभिनंदन. मात्र, अजूनही सापडलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते अक्षर कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. एखाद्या दुसऱ्या चॅलेंजमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. खालच्या फोटोत तुम्ही ते वेगळं अक्षर बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळं अक्षर सर्कल केलं आहे.