केवळ जीनिअस लोकच शोधू शकतील फोटोतील एक चूक, बघा तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 01:55 PM2024-09-19T13:55:42+5:302024-09-19T14:06:51+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करताना जास्तीत जास्त लोक कन्फ्यूज होतात. कारण हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे या फोटोंमधील गोष्टी समोरच असतात, पण त्या सहजपणे दिसत नाहीत. यातच एक वेगळी गंमत आहे. त्यामुळेच लोक असे फोटो आवडीने बघतात आणि त्यातील गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये तुम्ही काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात तर कधी यात तुम्हाला वेगळे नंबर किंवा काही चुका शोधायच्या असतात. असाच हा फोटो आहे. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ १० सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे हे फोटो सॉल्व करताना तुमचा मेंदू आणि डोळ्यांचीही कसरत होते. सोबतच तुमची आयक्यू टेस्टही होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्ही लगेच हे चॅलेंज पूर्ण करू शकता.
जर ठरलेल्या वेळेत म्हणजे १० सेकंदात तुम्हाला यातील वेगळा शब्द दिसला असेल तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा शब्द सर्कल केला आहे.