चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, शोधाल तर ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:20 IST2024-08-24T14:17:27+5:302024-08-24T14:20:38+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला खूप मेहनतीने शोधावं लागतं.

चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, शोधाल तर ठराल जीनिअस!
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच गंमत असते. त्यामुळे लहान असो वा मोठे सगळ्यांनाच असे फोटो सॉल्व करणं आवडतं. कारण यातून मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. सोबतच तुमचा चांगलं टाइमपासही होतो. असाच एक वेगळा फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे जे समोर असतं ते सहजपणे दिसत नाही. ते तुम्हाला खूप मेहनतीने शोधावं लागतं. कधी या फोटोंमध्ये काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात. तर कधी यात फरक शोधायचे असतात. आज आम्ही एक वेगळा नंबर शोधण्याचं चॅलेंज घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला 835 हा नंबर दिसत आहे ज्यात तुम्हाला 855 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ आहे.
महत्वाची बाब म्हणजे हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोटो फार बारकाईने बघावा लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करता येईल. अनेकदा असं होतं की, एकसारख्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये कन्फ्यूज व्हायला होतं. ते या फोटोबाबत आहे. पण तिच यातील खरी गंमत आहे.
जर तुम्हाला या फोटोतील 835 च्या गर्दीमध्ये वेगळा नंबर सापडला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा नंबर दिसला नसेल तर निराश होऊ नका. यातील वेगळा नंबर कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खाली दिलेल्या फोटोत तुम्ही यातील वेगळा नंबर काय आहे आणि कुठे आहे ते बघू शकता.
फोटोतील वेगळा नंबर सर्कल केला आहे.