या डॉक्टरांमध्ये लपला आहे एक वॅम्पायर, 5 सेकंदात ओळखा तुमचे Detective Skills
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 04:46 PM2023-06-01T16:46:34+5:302023-06-01T16:50:48+5:30
Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात फोटोत तीन डॉक्टर आहेत ज्यातील एक वॅम्पायर आहे. तोच शोधायचा आहे.
Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. त्यातील गोष्टी शोधणं किंवा त्यातील प्रश्नाचं उत्तर शोधणं हे लोकांसाठी चॅलेंजिंग असतं. पण यात त्यांना मजाही येते. कारण याने आयक्यू टेस्टही होते आणि डोळ्यांची टेस्टही होते. म्हणजे मनोरंजनासोबतच यातून बऱ्याच गोष्टींची टेस्ट होते. जे तुमच्या डेव्हलपमेंटसाठी चांगलं असतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात फोटोत तीन डॉक्टर आहेत ज्यातील एक वॅम्पायर आहे. तोच शोधायचा आहे.
जसे की, तुम्ही बघू शकता फोटोमध्ये तीन लोक उभे आहेत. पहिल्या नजरेत तुम्हाला ते डॉक्टर असल्याचं कळेल. तिघांपैकी डॉक्टर शोधणं तसं फार अवघड काम नाही, पण त्यासाठी तुम्हाला बुद्धीला चालना द्यावी लागेल. बारकाईने बघत काही गोष्टींचं निरीक्षण करावं लागेल आणि तुलना करावी लागेल. तरच तुम्ही यातील उत्तर शोधू शकाल.
रूममधील तीन डॉक्टरांवर तुम्ही नजर टाकाल तर लगेच तुमच्या लक्षात येईल की, यापैकी एक तो नाहीये जो दाखवला जात आहे. या फोटोतील उजव्या बाजूला असलेली व्यक्ती डॉक्टर नाहीये. तो डॉक्टरचं एक भ्रामक रूप आहे. तो मुळात एक वॅम्पायर आहे. बारकाईने बघाल तर वॅम्पायरचे दात आणि डोळे त्याचे हे स्पष्टच सांगत आहेत. त्यासोबतच इतर दोन डॉक्टरांना असलेला बिल्ला त्याच्या कोटवर नाहीये.