१० सेकंदात फोटोतील 'Rose' शब्द शोधून दाखवा, ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:16 PM2024-07-01T14:16:20+5:302024-07-01T14:17:10+5:30
Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे Nose असा शब्द दिसत आहे. पण यात वेगळा शब्द आहे तो म्हणजे Rose.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यात तुम्हाला काही गोष्टी शोधायच्या असतात. हा एक गेम आहे ज्यामुळे तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची कसरत होते आणि सोबतच तुमचा चांगला वेळही जातो. असाच एक वेगळा ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यांमध्ये जे असतं ते सहजपणे दिसत नाही ते शोधावं लागतं. मेंदुला चालना मिळत असल्याने हे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. म्हणूनच लोक एकमेकांना हे फोटो शेअर करतात आणि चॅलेंज देतात.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे Nose असा शब्द दिसत आहे. पण यात वेगळा शब्द आहे तो म्हणजे Rose. हा शब्द तुम्हाला १० सेकंदात शोधून काढायचा आहे. तसं तर हे काम करून बरेच लोक थकले आणि ते १० सेकंदात हे चॅलेंज पूर्ण करू शकले नाहीत. पण तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्हाला नक्कीच हा वेगळा शब्द सापडेल. चला तर मग लागा कामाला.
जर तुम्हाला १० सेकंदात या फोटोतील वेगळा म्हणजे Rose शब्द दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण अजूनही तुम्हाला दिसला नसेल तर निराश होऊ नका. आम्ही त्याला शोधण्यात तुमची मदत करू. खालच्या फोटोत Rose शब्द कुठे आहे हे तुम्ही बघू शकता.