Optical Illusion: Genius असाल तर या फोटोत किती चेहरे आहे ते शोधा, बरेच झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:05 AM2022-09-20T10:05:02+5:302022-09-20T10:10:55+5:30

Optical Illusion : अनेकांनी यातील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला, पण मोजक्याच लोकांना यात यश आलं. तुम्हाला या फोटोत जास्तीत जास्त चेहरे शोधायचे आहेत. याने तुमच्या मेंदूची आणि नजरेची टेस्टही होईल.

Optical illusion : Find total hidden faces in famous puzzle painting guess | Optical Illusion: Genius असाल तर या फोटोत किती चेहरे आहे ते शोधा, बरेच झाले फेल!

Optical Illusion: Genius असाल तर या फोटोत किती चेहरे आहे ते शोधा, बरेच झाले फेल!

googlenewsNext

Social Media Viral: ही फेमस पेंटींग मेक्सिकन आर्टिस्ट ऑक्टेवियो ओकाम्पोची असून या पेंटींगला डॉन क्विक्सोट म्हणून ओळखली जाते. या फोटोत जे रहस्य आहे ते शोधता शोधता तुमच्या नाकी नऊ येऊ शकतात. अनेकांनी यातील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला, पण मोजक्याच लोकांना यात यश आलं. तुम्हाला या फोटोत जास्तीत जास्त चेहरे शोधायचे आहेत. याने तुमच्या मेंदूची आणि नजरेची टेस्टही होईल.

किती आहेत चेहरे?

ऑक्टेवियो ओकाम्पोचे इल्यूजन एकाच फोटोच्या माध्यमातून पूर्ण कहाणी सांगण्याची क्षमता ठेवतात. या फोटोत तुम्हाला दोन व्यक्ती तर स्पष्टपणे दिसत आहेत. मैदानाकडे बारकाईने पाहिलं तर तुम्हाला एका श्वानाचा चेहराही दिसेल. शांत डोकं आणि बारीक नजरेने पाहिलं तर तुम्हाला फोटोतील एक एक चेहरा दिसू लागेल.

त्याशिवाय किल्ल्याच्या भींतीवर ड्यूकचा चेहराही दिसत असेल. फोटोत किल्ल्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक कवटीही दिसत असेल. पेंटिंगच्या वरच्या बाजूने आणि डाव्या बाजूने मिगुएल डे सर्वेंट्सचा भूतासारखा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करा. या फोटोत एकूण 15 पेक्षा जास्त चेहरे तुम्हाला शोधायचे आहेत. जे काही खायचं काम नाही.

एका आवरेजपेक्षा क्षमता असलेला मेंदू या ऑप्टिकल इल्यूजनमधील 15 पेक्षा जास्त चेहरे बघू शकतो. तुम्हाला तेच करायचं आहे. त्यासाठी नजर तीक्ष्ण आणि डोकं शांत हवं. तेव्हा तुम्हाला या फोटोतील रहस्य उलगडता येईल. 

Web Title: Optical illusion : Find total hidden faces in famous puzzle painting guess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.