Optical Illusion: समोर ठेवल्यात संत्र्यांच्या फोडी, त्यात टरबुज शोधून दाखवा! एवढेपण सोपे नाहीय, बरं का...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 02:35 PM2022-10-02T14:35:58+5:302022-10-02T14:36:27+5:30
पूर्वी कसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करायचा झाला की डोक्यातच कॅल्क्युलेशन सुरु व्हायची. आज तर डोक्याला ताण देऊनही उत्तर सापडत नाही.
आजकाल अनेकजण मोबाईल, कॅल्क्युलेटरमुळे मेंदूचा वापर करत नाहीत, आपण सगळे या गोष्टींमुळे पांगळे झालोय. पूर्वी कसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करायचा झाला की डोक्यातच कॅल्क्युलेशन सुरु व्हायची. आज तर डोक्याला ताण देऊनही उत्तर सापडत नाही. मग साध्या साध्या आकड्यांच्या आकडेमोडीसाठी देखील आपल्याला कॅल्क्युलेटर लागू लागले आहेत. परंतू, आता सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन नावाचा प्रकार आलाय, तो बऱ्यापैकी या शांत झालेल्या डोक्याला चावी द्यायला लावतो, आणि उत्तर सापडले की आनंदही देतो.
आजच्या या फोटोमध्ये संत्र्यांच्या साली सोलून त्याच्या फोडी एका परातीत ठेवले आहे. यातच एक टरबुजाची फोड देखील आहे. जी शोधता शोधता नाकीनऊ येत आहे. तुम्हाला ते टरबुज शोधायचे आहे, यासाठी तुम्हाला २० सेकंदांची वेळ आहे.
या फोटोमध्ये निरखून पाहिलात तर तुम्हाला सगळीकडे संत्रीच दिसतात. त्यातच एक टरबुजाची भेस आहे. प्रत्येकजण हे टरबूज शोधण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु काही जण वगळता बहुतेक लोक यात अयशस्वी ठरत आहेत. तुम्ही फोटोचा खालचा भाग पाहिला तर तुम्हाला डाव्या बाजूला टरबूजाचा तुकडा नक्कीच दिसेल.