चॅलेंज! ७ सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा शब्द, ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:45 PM2024-09-18T13:45:45+5:302024-09-18T13:47:17+5:30
Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यातील गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात. असे फोटो सॉल्व करणं सगळ्यांनाच आवडतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. कारण यातून तुमचं मनोरंजन तर होतंच, सोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे CAM असा शब्द दिसत आहे. पण यात केवळ CAM नसून एक वेगळा शब्दही आहे. तो म्हणजे CAN. हाच शब्द तुम्हाला शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे ७ सेकंदाची वेळ आहे.
अशा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी खूप हुशारीने लपवलेले असतात. तसेच एकसारख्या अनेक गोष्टी डोळ्यांसमोर आल्यावर कन्फ्यूजनही होतं. त्यामुळेच यातील गोष्टी शोधणं एक चॅलेंज असतं. आता तुम्हाला हे चॅलेंज पूर्ण करायचं आहे. तेही ठरलेल्या वेळेत.
तुम्ही जर ७ सेकंदात या फोटोतील वेगळा शब्द म्हणजे CAN हा शब्द शोधला असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील वेगळा शब्द दिसला नसेल तर निराशही होऊ नका. कारण यातील वेगळा शब्द शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही हा वेगळा शब्द बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा शब्द सर्कल केला आहे.