Optical Illusion : चॅलेन्ज! फोटोत लपलीय 'खारूताई', सापडतेय का पाहा?; शोधून दाखवलंत तर मानलं राव तुम्हाला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:13 PM2022-04-21T19:13:03+5:302022-04-21T19:22:36+5:30
बर्फाच्छादित रस्त्याचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. तुम्हाला फक्त चित्रात लपलेली एक छोटीशी खारूताई शोधायची आहे.
नवी दिल्ली - ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) आणि चित्र कोडी खूप मजेदार आहेत आणि म्हणूनच ती सोशल मीडियावर झटपट व्हायरल होतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इंटरनेट अशाच काही भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन टेस्टनी भरलेले आहे जे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दाखवत असतात. काही फोटो तुमची तीक्ष्ण नजर, एकाग्रता आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची चाचणी घेतात. यासोबतच ही चित्रे तुमच्या मेंदूसाठी देखील उत्तम व्यायाम आहेत. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
बर्फाच्छादित डोंगरी रस्त्याचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. तुम्हाला फक्त चित्रात लपलेली एक छोटीशी खारूताई शोधायची आहे. चित्रात तुम्ही एक पर्वतीय रस्ता पाहू शकता, जो बर्फाच्या चादरीने झाकलेला आहे. याच चित्रात कुठेतरी एक पांढरी खारूताई लपलेली आहे. पण ते शोधणे तुम्हाला वाटते तितके सोपे नाही. तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी असलेली व्यक्तीच ते पाहू शकेल.
तुम्हाला खारूताई दिसली असेल तर तुमचं अभिनंदन, परंतु तुम्ही अद्याप तिला शोधू शकला नसाल तर आम्ही मदत करतो. सर्वप्रथम, चित्राच्या वर पाहा. तुम्हाला बर्फात असलेली एक छोटी पांढऱ्या रंगाची खारुताई दिसेल. चित्र झूम केल्यास ते सहज पाहू शकता. यूएस नॅशनल आय इन्स्टिट्यूटच्या मते, ऑप्टिकल इल्यूजन ही अशी गोष्ट आहे जी तुमच्या दृष्टीशी खेळते. आपले डोळे आणि मेंदू एकत्र कसे कार्य करतात हे ते आपल्याला शिकवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.