Optical Illusion: या फोटोत किती हत्ती पाणी पित आहेत? बरोबर उत्तर सांगणं झालंय अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 12:43 PM2022-12-15T12:43:40+5:302022-12-15T12:48:56+5:30

Optical Illusion : आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही हत्ती दिसत आहेत. पण यात किती हत्ती दिसत आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे.

Optical illusion : How many elephants are hidden in this picture | Optical Illusion: या फोटोत किती हत्ती पाणी पित आहेत? बरोबर उत्तर सांगणं झालंय अवघड

Optical Illusion: या फोटोत किती हत्ती पाणी पित आहेत? बरोबर उत्तर सांगणं झालंय अवघड

Next

Optical Illusion Test :  सोशल मीडियावर सध्या अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. ज्यातील रहस्य तुम्हाला शोधायचं असतं. हे फोटो बघून लोक हैराण होतात. ऑप्टिकल इल्यूजनमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. या फोटोंमधील रहस्य, प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायची असतात. या फोटोंमुळे तुमचं ऑब्जर्वेशन स्किलही सुधारतं. आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही हत्ती दिसत आहेत. पण यात किती हत्ती दिसत आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे.

जास्तीत जास्त लोक हैराण करणारा हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहून अवाक् झाले आहेत. यात तीन विशाल हत्ती नदी किनारी पाणी पिताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत हत्तीचं एक पिल्लूही आहे. या फोटोत किती हत्ती आहेत हे शोधण्यासाठी तुम्हाला फोटो फार बारकाईने बघावा लागेल. जर तुम्हाला वाटत असेल की, या फोटोत केवळ 4 हत्ती आहेत तर तुमचं उत्तर चुकीचं आहे. यात चार हत्ती दिसत असले तरी चार हत्ती नाहीयेत. जास्तीत जास्त लोक याचं बरोबर उत्तर देऊ शकलेले नाहीयेत. 

जर तुम्ही बारकाईने हा फोटो बघाल तर तुम्हाला तुमचं बरोबर उत्तर मिळेल. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला दोन मोठ्या हत्तींच्या पायांमधे एक हत्तीच्या पिल्लाचं डोकं दिसेल. यात एकूण किती हत्ती आहेत याचं बरोबर उत्तर अनेकजण देऊ शकलेले नाहीत. त्याचं बरोबर उत्तर आहे 7 हत्ती.

वरील फोटोत दोन मोठ्या हत्तींच्या मधे एक छोटा हत्ती आहे. एकूण सात.

Web Title: Optical illusion : How many elephants are hidden in this picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.