Optical Illusion: या फोटोत तुम्हाला किती पाय दिसत आहेत? केवळ जीनिअस लोकच देऊ शकतील बरोबर उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 09:29 AM2023-05-03T09:29:00+5:302023-05-03T09:30:35+5:30
Optical Illusion : हा फोटो एक मास्टरपीस आहे जो आजही लोकांना आकर्षित करतो. पहिल्यांदा पाहिल्यावर या फोटोत काही पाय दिसतात. पण नंतर बारकाईने बघाल तर यात खूपकाही दिसतं.
Optical Illusion Find The Legs : आजकाल लोकांना सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करण्यात फार मजा येते. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. या फोटोंमध्ये जे दिसतं ते नसतं. जे नसतं तेच आपल्याला दिसतं. एकप्रकारे आपल्या डोळ्यांसाठी आणि मेंदुसाठी हे फोटो आव्हान तयार करतात. आपलं कन्फ्यूजन वाढवतात. अशाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, 1975 मध्ये दिवंगत जपानी कलाकार शिगियो फुकुदा यांनी हा फोटो तयार केला होता.
हा फोटो एक मास्टरपीस आहे जो आजही लोकांना आकर्षित करतो. पहिल्यांदा पाहिल्यावर या फोटोत काही पाय दिसतात. पण नंतर बारकाईने बघाल तर यात खूपकाही दिसतं. हा फोटो शेअर करून चॅलेंज देण्यात आलं आहे. चॅलेंज हे आहे की, या फोटोत किती पाय आहेत? आता हेच मोठं आव्हान आहे की, यातील पाय तुम्ही माजू शकता की नाही.
रिपोर्टनुसार जे लोक पुरूषांचे पाय आधी बघतात ते लोक डायरेक्ट कम्युनिकेटर असतात तर जे लोक आधी महिलांचे पाय बघतात ते लोक बोलण्याआधी विचार करतात आणि आपल्या भावाना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधण्यात संघर्ष करतात. जर तुम्ही दोन्ही पाय सोबत पाहिले असतील तर तुम्ही एक डायरेक्ट कम्युनिकेटर आहात, ज्यांना कोणत्याही प्लानशिवाय आपला सल्ला देण्याची सवय आहे.
मुख्य प्रश्न हा आहे की, तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनमध्ये किती पाय शोधता? जर तुम्ही पुन्हा पुन्हा हा फोटो बघाल तर तुम्हाला दिसेल की, यात 11 पुरूष आणि11 महिलांचे पाय आहेत. एकूण 22 पाय आहेत.