Optical Illusion : शोधून दाखवाच! 'या' चित्रात लपलीय मनीमाऊ अन् 7 माणसं; जो शोधेल तो ठरेल 'सुपर ह्यूमन' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 12:40 PM2022-06-07T12:40:09+5:302022-06-07T12:52:10+5:30

Optical Illusion : आजचे ऑप्टिकल इल्युजन हे एक पेन्सिल ड्रॉईंग आहे, ज्यामध्ये तुम्हाला लोकांची नेमकी संख्या शोधावी लागेल. या गुंतागुंतीच्या चित्रात एकूण सात व्यक्ती आणि एक मांजर लपली आहे.

optical illusion humans are hidden in- his picture did you see | Optical Illusion : शोधून दाखवाच! 'या' चित्रात लपलीय मनीमाऊ अन् 7 माणसं; जो शोधेल तो ठरेल 'सुपर ह्यूमन' 

Optical Illusion : शोधून दाखवाच! 'या' चित्रात लपलीय मनीमाऊ अन् 7 माणसं; जो शोधेल तो ठरेल 'सुपर ह्यूमन' 

Next

नवी दिल्ली - ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) आणि चित्र कोडी खूप मजेदार आहेत आणि म्हणूनच ती सोशल मीडियावर झटपट व्हायरल होतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आजचे ऑप्टिकल इल्युजन हे एक पेन्सिल ड्रॉईंग आहे, ज्यामध्ये तुम्हाला लोकांची नेमकी संख्या शोधावी लागेल. या गुंतागुंतीच्या चित्रात एकूण सात व्यक्ती आणि एक मांजर लपली आहे. हे सर्व लोक कुठे लपले आहेत शोधण्यासाठी तुम्हाला बारीक लक्ष द्यावे लागेल. इतकंच नाही तर ज्यांना आपली आयक्यू पातळी तपासायची आहे, त्यांच्यासाठी हे ड्रॉईंग उत्तम आहे. जो शक्य तितक्या लवकर उत्तर देईल त्याला सुपर ह्यूमन म्हटलं जाईल.

सात लोक आणि एक मांजर

ऑप्टिकल इल्युजन हे एक व्हिज्युअल इल्युजन आहे. असे दिसते की आपले डोळे आपल्याला फसवत आहेत. असं इल्युजन पाहून आपले डोळे कधीकधी गोंधळतात. शास्त्रज्ञांनुसार, इल्युजनचे कारण हे आहे आहे की आपले डोळे अशाच गोष्टी पाहतात ज्या आपण आधीही पाहिलेल्या आहेत. आता हे चित्र पाहा आणि त्यातील लोकांची संख्या शोधा. तुम्ही चित्रात किती लोक पाहू शकता? ते चार किंवा चारपेक्षा जास्त आहेत का? हे चित्र एक ड्रॉईंग आहे जे डार्कसीडीने टिकटॉकवर शेअर केले होते.

या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला किती लोक सापडले? जर तुम्हाला फक्त दोनच लोक दिसले असतील तर तुमची आयक्यू पातळी चांगली नाही. पुन्हा चित्र पाहा आणि लोकांना शोधण्याचा प्रयत्न करा. ड्रॉईंगमध्ये सात लोक आहेत. काही ड्रॉईंगच्या वरच्या डाव्या बाजूला आहेत, काही चित्राच्या मध्यभागी कारजवळ आहेत. खाली एक मांजर लपली आहे. जर तुम्हाला सर्व सात माणसं आणि एक मांजर सापडली असेल, तर तुम्ही एक सुपर जीनियस आहात, आणि जर तुम्हाला ते अद्याप सापडले नाहीत, तर काही फरक पडत नाही, आम्ही तुम्हाला चित्रात माणसं कुठे आहेत ते सांगू. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: optical illusion humans are hidden in- his picture did you see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.