Optical Illusion: झाडावर बसला आहे एक पक्षी, तासंतास शोधूनही सापडेना; बघा तुम्हाला दिसतो का!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 03:53 PM2023-04-29T15:53:11+5:302023-04-29T15:55:24+5:30
Search Bird Sitting On Branch: महत्वाची बाब म्हणजे हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो केवळ आपलं मनोरंजन करतात असं नाही तर यातून तुमची आयक्यू टेस्टही होते आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजतो.
Search Bird Sitting On Branch: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) असलेले फोटो व्हायरल होत असतात. महत्वाची बाब म्हणजे हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो केवळ आपलं मनोरंजन करतात असं नाही तर यातून तुमची आयक्यू टेस्टही होते आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजतो.
हे फोटो पाहून लोक चक्रावून जातात. कारण त्यातील रहस्य शोधणं लोकांसाठी अवघड असतं. काही लोकांची नजर तीक्ष्ण असते ते लगेच या फोटोंमधील रहस्य उलगडतात. असाच एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत लपला आहे एक पक्षी. ज्याला शोधणं अनेकांसाठी अशक्य झालं आहे.
फोटोत झाडाची काही पाने आणि फांद्या दिसत आहेत. यातच एक पक्षी लपला आहे. फोटो तसा फारच सोपा वाटतोय. त्यात किचकट असं काही दिसत नाहीये. तरी सुद्धा यातील पक्षी काही अनेकांना दिसत नाहीये. फार कमी लोकांना यातील पक्षी दिसला.
या फोटोने अनेकांना कन्फ्यूज केलं आणि लोक हैराण होऊन या फोटो दुसऱ्यांना पाठवून त्यांना चॅलेंज देत आहेत. कारण ते यातील पक्षी शोधू शकलेले नाहीत. यातील एक खास बाब म्हणजे झाडाच्या पानांचा आणि पक्ष्याचा रंग एकसारखा आहे. त्यामुळे हा पक्षी शोधणं फारच अवघड झालं आहे. पण जर तुम्ही तुमच्या तीक्ष्ण नजरेने पक्षी शोधाल तर नक्कीच सापडेल.
यात अजिबातच दुमत नाही अशाप्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन नेहमीच मजेदार आणि तेवढेच चॅलेंजिंग असतात. जर आपण यातील बरोबर उत्तर शोधलं तर आपल्या डोळ्यांबाबत आणि मेंदूबाबत आपलाच कॉन्फिडन्स अधिक वाढतो. या फोटोंमधील गुपित शोधण्यासाठी नजर आणि मेंदूचा ताळमेळ साधणं फार गरजेचं असतं. जर तुम्हाला अजूनही या फोटोतील पक्षी दिसला नसेल तर उत्तर खाली आहे.