'जादू'! 'या' फोटोत आहेत लोक चार अन् हात दिसताहेत तीन; पण असं का भौ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 05:51 PM2021-09-03T17:51:08+5:302021-09-03T17:58:30+5:30
हा ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जर तुम्ही लक्ष देऊन फोटो बघाल तर तुमच्याही लक्षात येईल की नेमका काय झोल आहे.
या फोटोमुळे सोशल मीडिया यूजर्स कन्फ्यूज झाले आहेत. कारण पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटतं की या फोटोत चार लोक आहेत. पण बारकाईने लक्ष दिल्यावर लक्षात येतं की, हात तर तीनच लोकांचे आहेत. अशात प्रश्न उपस्थित राहतो की, चौथ्या व्यक्तीचा हात कुठे आहे? हेच कारण आहे की, हा ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जर तुम्ही लक्ष देऊन फोटो बघाल तर तुमच्याही लक्षात येईल की नेमका काय झोल आहे.
My brain refuses to believe there are 4 people in this photo pic.twitter.com/GOwglY3vyw
— Jen Gentleman 🌺 (@JenMsft) February 14, 2021
हा फोटो ट्विटर यूजर @JenMsft ने शेअर केला आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शनला लिहिलं आहे की 'माझ्या डोक्याने हे मान्य करण्यास नकार दिला की, फोटोत चार लोक आहेत'. या फोटोला आतापर्यंत लाखो लाइक्स मिळाले आहेत आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. तुम्हाला प्रकरण क्लीअर झालं की नाही? (हे पण वाचा : डोळ्यांसमोरच आहे वाघ, पण लोकांना काही दिसेना झालाय; बघा तुम्ही ट्राय करा!)
मुळात हा फोटो रेडीट यूजरने शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनला लिहिलं होतं की, शप्पथ आम्ही यात चार लोक आहोत. पण फोटोत दिसत असलेल्या तीन हातांमुळे लोकांना धर्मसंकटात टाकलं आहे. कारण जे दिसतं ते तसं नसतं. तुम्हीच शोधा काय ते....
जर तुम्हाला आधीच चौथ्या व्यक्तीचा हात दिसला असेल, तुमची नजर कमाल आहे असं समजा.