Optical illusion: केवळ जिनिअस लोकच शोधू शकतात या फोटोत लपलेलं गाजर, 10 सेकंदाचा आहे वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 02:28 PM2023-01-24T14:28:26+5:302023-01-24T14:31:43+5:30

Optical illusion: ऑप्टिकल इल्यूजनमध्ये काही रहस्य किंवा काही प्रश्न दडलेले असतात. जे आपलं मनोरंजन करतात आणि आपल्या बुद्धीला चालना देतात.

Optical illusion : Only a genius can spot carrots in this picture check your brain | Optical illusion: केवळ जिनिअस लोकच शोधू शकतात या फोटोत लपलेलं गाजर, 10 सेकंदाचा आहे वेळ

Optical illusion: केवळ जिनिअस लोकच शोधू शकतात या फोटोत लपलेलं गाजर, 10 सेकंदाचा आहे वेळ

googlenewsNext

Optical illusion: सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजन लोकांच्या दृष्टीवर प्रभाव टाकतात. यूएस नॅशनल आय इन्स्टिट्यूटनुसार, ऑप्टिजन इल्यूजन आपल्याला सांगतं की, कशाप्रकारे आपले डोळे आणि मेंदू मिळून दोन किंवा त्यापेक्षा अर्थ असलेला फोटो पाहतात. ऑप्टिकल इल्यूजनमध्ये काही रहस्य किंवा काही प्रश्न दडलेले असतात. जे आपलं मनोरंजन करतात आणि आपल्या बुद्धीला चालना देतात.

काही ऑप्टिकल इल्यूजन आपल्या पर्सनॅलिटीबाबत सांगतात तर काहींमध्ये काहीतरी शोधायचं असतं. असाच एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला गाजर शोधायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाच वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन सॉल्व करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. हे सॉल्व केल्याने आपली दृष्टी चांगली होते आणि मेंदूची एक्सरसाइजही होते. तसेच याने आपली आयक्यू टेस्टही होते. अशात ऑप्टिकल इल्यूजन अनेकांना आवडतात.

अनेकदा ऑप्टिकल इल्यूनज फोटोंमध्ये ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात त्या तशा नसतात. अशा फोटोतील रहस्य उलगडनं फार अवघड असतं. सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात जे सॉल्व केले जात नाहीत. आता आम्ही आणलेल्या फोटोत तुम्हाला गाजर शोधायचे आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत वेगवेगळ्या भाज्या आणि फळं ठेवलेली आहेत. पण त्यातील गाजर शोधणं अनेकांना जमलेलं नाहीये. बारकाईने बघाल तरच तुम्हाला यातील गाजर दिसू शकेल. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. नसेल दिसलं तर खालच्या फोटोत दिसेल.

Web Title: Optical illusion : Only a genius can spot carrots in this picture check your brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.