Optical Illusion: जिराफच्या एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत आहे ३ फरक, शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 01:32 PM2024-07-05T13:32:00+5:302024-07-05T13:39:05+5:30
Optical Illusion : आम्ही तुमच्यासाठी एक सोपा दिसणारा पण सॉल्व करण्यासाठी थोडा अवघड असा एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यातील काही फोटो सॉल्व करण्यासाठी फारच सोपे तर काही फोटो फारच चॅलेंजिंग असतात. कधी यांमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात तर कधी अजून काही. आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपा दिसणारा पण सॉल्व करण्यासाठी थोडा अवघड असा एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत.
आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक बेबी जिराफ झाडाची पाने खाताना दिसत आहे. त्याच्या तोंडात काही पाने आहेत. मागे झुडपं आहेत. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात, पण यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. तसं हे काम वाटतं सोपं पण सोपं नाहीये. फरक शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. खालच्या फोटोत तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत तेही १० सेकंदात.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे नेहमीच लोकांच्या आवडीचे असतात. कारण यातून त्यांचं चांगलं मनोरंजन होतं. सोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. तुमची आयक्यू टेस्टही होते. मानसिक आरोग्यासाठी हे फोटो फायदेशीर मानले जातात. म्हणून हे फोटो खूप व्हायरल होत असतात.
जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला दिलेल्या वेळेत नक्कीच यातील फरक लगेच सापडतील. जर तुम्हाला १० सेकंदात फोटोतील फरक सापडले असतील तर तुम्ही जीनिअस आहात. पण जर अजूनही सापडले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत ते फरक तुम्ही बघू शकता.
दोन्ही एकसारख्या दिसणाऱ्या फोटोतील फरक सर्कल केले आहेत.