जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा मनुष्यांच्या गर्दीतील प्राणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 09:30 AM2023-10-05T09:30:30+5:302023-10-05T09:32:38+5:30

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला मनुष्यांची मोठी गर्दी दिसत आहे. यात एक प्राणीही आहे. त्यालाच तुम्हाला शोधायचं आहे. 

Optical Illusion : Only one percent people can spot animal hidden among humans within 7 seconds | जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा मनुष्यांच्या गर्दीतील प्राणी

जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा मनुष्यांच्या गर्दीतील प्राणी

googlenewsNext

Optical Illusion : लोकांना ऑप्टिकल इल्यूजन फोटोंच्या माध्यमातून आपली विचार करण्याची आणि बघण्याची क्षमता टेस्ट करणं आवडतं. हे फोटो एक ब्रेन टीजर असतात. हे  फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यात जे असतं ते सहज दिसत नाही ते तुम्हाला शोधावं लागतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला मनुष्यांची मोठी गर्दी दिसत आहे. यात एक प्राणीही आहे. त्यालाच तुम्हाला शोधायचं आहे. 

अनेकदा काही ऑप्टिकल इल्यूजन फोटो लगेच सॉल्व केले जातात. तर कधी कधी यातील गोष्टी शोधण्यात बराच वेळ लागतो. या फोटोतील प्राणी शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. बारकाईने बघाल तर तुम्हाला लगेच यातील प्राणी दिेसेल, पण हे काम इतकंही सोपं नाही.

या फोटोत तुम्हाला बरेच महिला आणि पुरूष दिसत आहेत. जर तुम्ही बारकाईने फोटो बघाल तर यात तुम्हाला एक प्राणीही दिसेल. यात तुम्हाला एक पांडा दिसेल. असा दावा करण्यात आला आहे की, केवळ 1 टक्के लोकच पांडाला 7 सेकंदात शोधू शकले. 

जर 7 सेकंदात तुम्हाला या फोटोतील पांडा दिसला असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला पांडा दिसला नसेल तर निराश होऊ नका. तो या कुठे आहे ते तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

Web Title: Optical Illusion : Only one percent people can spot animal hidden among humans within 7 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.