Optical Illusion : ओपन चॅलेंज! फक्त 5 सेकंदात या फोटोतील ससा शोधा, 99 टक्के लोक फसले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 06:51 PM2023-03-01T18:51:26+5:302023-03-01T18:52:02+5:30

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. अशाप्रकारचे फोटो भल्याभल्यांना गोंधळात टाकतात.

Optical Illusion : Open Challenge! Find the rabbit in this photo in just 5 seconds | Optical Illusion : ओपन चॅलेंज! फक्त 5 सेकंदात या फोटोतील ससा शोधा, 99 टक्के लोक फसले...

Optical Illusion : ओपन चॅलेंज! फक्त 5 सेकंदात या फोटोतील ससा शोधा, 99 टक्के लोक फसले...

googlenewsNext


Optical Illusion: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. अशाप्रकारचे फोटो भल्याभल्यांना गोंधळात टाकतात. लोक या ऑप्टिकल इल्युजन फोटोंमध्ये लपलेली कोडी सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु बहुतांश लोकांना ते सोडवण्यात यश मिळत नाही. अनेकांना ही कोडी सोडवण्यात मजाही येते. ऑप्टिकल इल्युजन चित्रे समजून घेणे आणि सोडवणे हा मेंदूसाठी आणि डोळ्यांसाठी एक उत्तम व्यायाम आहे. असाच एक फोटो सध्या व्हायरल होतोय, ज्यात एक ससा लपलेला आहे, जो तुम्हाला शोधायचा आहे. 

लोकांना ऑप्टिकल इल्युजन गेम्स खेळायला खूप आवडतात. अशाप्रकारच्या गेममध्ये तुम्हाला कोणत्याही ऑप्टिकल इल्युजनमध्ये लपलेल्या वस्तू शोधाव्या लागतात. या चित्रांमध्ये गोष्टी अशा प्रकारे दडलेल्या असतात, की त्या डोळ्यासमोर असूनही दिसत नाहीत. या फोटोतील ससा शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच सेकंद आहेत. जर तुम्ही पाच सेकंदात ससा शोधू शकलात तर तुमचा मेंदू आणि डोळे तीक्ष्ण आहेत, असे मानले जाईल. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये एक जंगल दिसत आहे, ज्यामध्ये हिरवीगार झाडे आहेत. ससा या झाडांमध्ये लपला आहे. चित्रातील ससा शोधण्यात बहुतांश लोकांना यश आलेले नाही. जर तुम्हाला वरील चित्रात ससा दिसत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. चित्रात दिसणार्‍या झुडपात नीट पाहिल्यास ससा दिसतो. ज्यांनी हा ससा शोधला, त्यांची नजर तीक्ष्ण आहे. 

Web Title: Optical Illusion : Open Challenge! Find the rabbit in this photo in just 5 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.