'हा' फोटो पाहून लोकांचं डोकं चक्रावलं, पुन्हा पुन्हा बघाल तर व्हाल कन्फ्यूज!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 12:32 PM2024-03-01T12:32:33+5:302024-03-01T12:33:35+5:30
आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. जो बघून तुमचं डोकं चक्रावून जाईल. विचारात पडला की, नेमकं काय होत आहे.
सोशल मीडियावर जास्तीत जास्त लोक टाइमपास करतात. काही लोक व्हिडीओ बघतात तर काही लोक माहिती घेतात. तर काही लोक क्वीज गेम्सने आपलं मनोरंजन करतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. जो बघून तुमचं डोकं चक्रावून जाईल. विचारात पडला की, नेमकं काय होत आहे.
पहिल्या नजरेत या फोटोत तुम्हाला काहीतरी दिसतं आणि दुसऱ्याच क्षणी ते गायब होतं. ज्यामुळे डोकं चक्रावतं. प्रश्न पडतो की, असं का होतंय? सुरूवातीला तुम्हाला या फोटोत काळ्या बिंदुचा एक ग्रिड दिसतो. पण नंतर लगेच तो पांढरा होतो. अशात जर तुम्ही हे काळे बिंदू मोजण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला दिसणार नाहीत.
हे ऑप्टिकल इल्यूजन Optics4Kids ने शेअर केलं आहे. ज्यात सांगण्यात आलं की, बिंदुंवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला हे दिसण्यात मदत मिळते की, मुळात ते पांढरे आहेत. वेबसाइटने सांगितलं की, या फोटोत एकही काळा बिंदू नाहीये. पण आपल्याला जाणवतं की, काळे बिंदू आहे. पण जेव्हा तुम्ही फोकस कराल तेव्हा कळेल की, हा फक्त भ्रम आहे.
अशाप्रकारचे ग्रिडसंबंधी इल्यूजन कुणालाही चकमा देऊ शकतात. हरमन ग्रिड इल्यूजनचा रिपोर्ट सगळ्यात आधी 1870 मध्ये लुडिमर हरमनने दिला होता. ज्याच्या नावावर याचं नाव ग्रिड इल्यूजन पडलं आहे.