या फोटोमध्ये दडलंय 'b' हे इंग्रजी अक्षर पण जिनियस असाल तरच सापडेल, पाहा सापडतंय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:29 PM2022-08-18T16:29:50+5:302022-08-18T16:32:07+5:30
नजरेसमोर असूनही आपल्याला फोटोमध्ये लपलेली गोष्ट दिसत नाही. त्यामुळे आपण शोधत राहातो. मात्र लपलेलं चित्र डोळ्यांसमोरच असतं. एक फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला B हे अक्षर शोधायचं आहे.
ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion) कोड्यासारखंच आहे. इथे तुम्हाला फोटो किंवा चित्रात लपलेला प्राणी, पक्षी किंवा एखादं चित्र शोधायचं असतं. डोक्याला चालना देणारा हा खेळ आहे. नजरेसमोर असूनही आपल्याला फोटोमध्ये लपलेली गोष्ट दिसत नाही. त्यामुळे आपण शोधत राहातो. मात्र लपलेलं चित्र डोळ्यांसमोरच असतं. एक फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोमध्ये तुम्हाला B हे अक्षर शोधायचं आहे.
हे कोड थोडं कठीणही वाटू शकतं. कारण या फोटोकडे पाहिल्यानंतर डोळ्यांना त्रास होतो. या फोटोमध्ये सगळे R लिहिले आहेत. यामध्ये B हे अक्षर दडलं आहे. जे तुम्हाला शोधायचं आहे. 12 सेंकदात जर तुम्हाला शोधता आलं तर तुम्ही हे कोडं सोडवलं आणि हुशार आहात. तुम्ही जर हे कोडं सोडवू शकलात तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील हे कोडं घालू शकता आणि तुम्ही हुशार आहात हे सिद्ध करू शकता.
ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) चॅलेंजमध्ये या फोटोमध्ये 'आर' अनेकदा एक-दोन नव्हे तर 10 हून अधिक वेळा ओळींमध्ये लिहिलेला दिसत आहे. फोटोत फक्त प्रथमदर्शनी आपल्याला 'आर' हा 'आर' दिसेल. पण इतके R एकत्र पाहून डोळ्यांना आणि डोक्यावरही ताण येतो. यामध्ये B अक्षर शोधणं आव्हानात्मक होऊन जातं. अनेकांना हे पाहून विचित्र देखील झालं. तर काही जणांना याचं उत्तरही मिळालं.
सोशल मीडियावर हा फोटो सध्या खूप चर्चेत आला आहे. R च्या ओळींमध्ये लपलेला B शोधण्याची मजा काही लोकांनी घेतली. एक दोन नाही तर हे चित्र 5 हून अधिकवेळा पाहिलं तर आपल्याला नक्की B कुठे लपला आहे ते समजतं. पण पहिल्या नजरेत हे ओळखणं तरी कठीण आहे. तुम्हीही हे चॅलेंज घ्या आणि पाहा तुम्हाला एक झटक्यात B शोधता येत आहे का?