Optical illusion: हे लँप पाहून बत्ती पेटवा; असा फोटो जो गरगरवून सोडेल; दिसतेय एक, आहे भलतेच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 03:42 PM2022-05-03T15:42:42+5:302022-05-03T15:43:06+5:30
हा फोटो सर्वात आधी फेसबुक मार्केटप्लेसवर शेअर करण्यात आला होता. नंतर हा फोटो रेडिटवरही व्हायरल झाला.
दिमाग की बत्ती गुल म्हणतात ना तसाच हा प्रकार आहे, भ्रामक फोटोंचा. दिखविले काही वेगळेच जाते, असते भलतेच. असा प्रकार तुमच्यासोबत तर झालाय का? Optical illusion चे हो फोटो एवढे डोके येडे करून सोडतात की, काहीच समजत नाही. अनेकजण तर त्याचा नादच सोडून देतात.
आता या फोटोचेच पहा ना, या फोटोत दोन लँप आहेत. दिसायलाही एकसारखेच आहेत. परंतू ते हिरवळीवर ठेवलेले आहेत. चला तुम्ही शोधून दाखवा पाहू, नेमका काय प्रकार आहे. पाहुया लँप पाहून तरी दिमाग की बत्ती झटकन पेटते का ते,...
न्यूयॉर्क पोस्टनुसार, हा फोटो सर्वात आधी फेसबुक मार्केटप्लेसवर शेअर करण्यात आला होता. 'हे फेसबुक मार्केटप्लेसचे दिवे किती मोठे आहेत?' अशी त्याची कॅप्शन होती. नंतर हा फोटो रेडिटवरही व्हायरल झाला. फोटोमध्ये दोन मोठे दिवे ठेवलेले दिसतात. पण हे दिवे दिसतात तितके मोठे नाहीत. याच्यामागे फोटोग्राफीतील युक्ती वापरण्यात आली आहे.
फोटो इतका जवळून काढला आहे की दिव्यांचा आकार खूप मोठा दिसतो. एका यूजरने लिहिलेय की, या फोटोमध्ये डेप्थ ऑफ फील्ड देखील आहे. हा फोटो मुद्दामहून काढण्यात आला असेल, हे सांगू शकत नाही. किंवा कोणत्यातरी नवीन फोनमधील कॅमेरॅची ही ट्रिक आहे.