डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा या फोटोतील मगर, 7 सेकंदाची आहे वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 12:37 PM2024-02-20T12:37:46+5:302024-02-20T12:42:01+5:30

Optical Illusion : यात काही चुका शोधायच्या असतात तर कधी यातील लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

Optical Illusion : Sharp eyes person will able to find crocodile in 7 seconds 99 percent fail | डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा या फोटोतील मगर, 7 सेकंदाची आहे वेळ

डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा या फोटोतील मगर, 7 सेकंदाची आहे वेळ

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंद्वारे तुमचा मेंदू आणि डोळ्यांची टेस्टही होते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे फोटो बघण्यात आणि त्यातील रहस्य शोधण्यात मजा वाटते. यात काही चुका शोधायच्या असतात तर कधी यातील लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

या फोटोत तुम्हाला एक मगर शोधायची आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तर तुम्ही नक्कीच या फोटोत लपलेली मगर शोधू शकला. पण त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. यातील मगर शोधणं इतकंची सोपं काम नाही. कारण ती अशी लपवण्यात आली आहे की, सहजपणे दिसणार नाही.

हे ब्रेनटीजर ब्राइटसाईड (Brightside) ने शेअर केलं आहे. मगर शोधण्यासाठी तुम्हाला फोटोच्या चारही बाजूने बारकाईने बघावं लागेल. तेव्हाच तुम्हाला यातील मगर दिसून येईल. पहिल्यांदा प्रयत्न केल्यावर केवळ 1 टक्के लोकांनाच यश मिळालं. बाकी लोक फेल झालेत. 

जर तुम्हाला 7 सेकंदात या फोटोतील मगर दिसली असेल तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही दिसली नसेल तर निराश होऊ नका. तिला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही याचं उत्तर बघू शकता.

Web Title: Optical Illusion : Sharp eyes person will able to find crocodile in 7 seconds 99 percent fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.