जीनिअस असाल तर 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, 99 टक्के लोक झाले फेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 02:07 PM2024-07-30T14:07:40+5:302024-07-30T14:08:55+5:30
Optical illusion: या फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची कसरतही चांगली होते.
Optical illusion: ऑप्टिकल इल्यूजन फोटो आजकाल सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कारण हे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. लोक असे फोटो शेअर करून एकमेकांना चॅलेंजही देत असतात. या फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची कसरतही चांगली होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये काही वस्तू शोधायच्या असतात कधी यात काही वेगळे नंबर शोधायचे असतात तर कधी एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये फरक शोधायचे असतात. आम्ही तुमच्यासाठी एक नंबर शोधण्याचा फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला वेगळा नंबर 10 सेकंदात शोधायचा आहे. फोटोत तुम्हाला सगळीकडे 8786 हा नंबर दिसत आहे. पण यात एक वेगळा नंबर आहे जो तुम्हाला शोधायचा आहे.
तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर मग लागा कामाला. आता तुम्ही फोटो बारकाईने बघा आणि मग त्यात वेगळा नंबर शोधा. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. त्यातल्या त्यात तुम्हाला 10 सेकंदाच्या वेळेचं बंधनही आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो अशा पद्धतीने डिझाइन केले जातात की, त्यातील गोष्टी आपल्या डोळ्यांसमोरच असूनही लगेच दिसत नाही.जर तुम्हाला या फोटोतील वेगळा नंबर दिसला असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण तो काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो बघू शकता.