फोटोत लपलं आहे एक हरीण, 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 12:06 PM2024-05-10T12:06:38+5:302024-05-10T12:22:09+5:30
Optical Illusion : आपल्या समोरच असलेली गोष्ट आपल्या दिसत नाही. ती गोष्ट तुम्हाला शोधावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो खूप मजेदार असतात. या फोटोंच्या माध्यमातून मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. ऑप्टिकल इल्यूजन हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो असतात. म्हणजे आपल्या समोरच असलेली गोष्ट आपल्या दिसत नाही. ती गोष्ट तुम्हाला शोधावी लागते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत एक हरीण शोधायचं आहे. महत्वाची बाब म्हणजे ते शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे. फोटोत तुम्हाला एक जंगल दिसत आहे. झाडी, तलाव आणि दगड आहेत. त्यात एक हरीण लपलं आहे. तेच तुम्हाला शोधायचं आहे.
पहिल्यांदा तुम्ही फोटो बघाल तर तुम्हाला सहजपणे हरीण दिसणार नाही. ते शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. फोटो बारकाईने बघाल तर नक्कीच तुम्हाला ते दिसेल. पण वेळ केवळ 7 सेकंदाची आहे.
जर तुम्हाला अजूनही हरीण दिसलं नसेल तर आम्ही तुम्हाला ते कुठं आहे त्याची एक हिंट देतो. हरीण झाडांमध्ये लपलं आहे आणि हरीणाचा रंगही हिरवा आहे. आता जर अजूनही तुम्हाला हरीण दिसलं नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत ते कुठे आहे ते बघू शकता.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंना दृष्टिभ्रम असंही म्हटलं जातं. हे फोटो सॉल्व केल्याने आपलं ऑब्जरवेशन स्किलही वाढतं. ही एकप्रकारची मेंदुची कसरत आहे. हे सॉल्व केल्याने मेंदुला चालना मिळते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे फोटो आवडतात.