मनुष्यांमध्ये बसला आहे एक डॉगी, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 01:01 PM2023-06-13T13:01:57+5:302023-06-13T13:03:41+5:30

Optical Illusion : तुमच्या समोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला मनुष्यांचे अनेक चेहरे दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव आणि स्टाइल दिसत आहे. याच चेहऱ्यांमध्ये एक डॉगी लपला आहे.

Optical Illusion : Spot dog in these human faces online mind sharpness game | मनुष्यांमध्ये बसला आहे एक डॉगी, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

मनुष्यांमध्ये बसला आहे एक डॉगी, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

googlenewsNext

Optical Illusion : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून लोकांना खूप सारे गेम्स आणि क्वीज खेळण्याची संधी मिळते. या फोटोंमध्ये तुम्हाला काही गोष्टी शोधायच्या असता तर कधी फोटोंमधील अंतर शोधायचं असतं. आज आम्ही तुमच्यासाठी एक असाच फोटो घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला एक डॉगी शोधायचा आहे.

तुमच्या समोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला मनुष्यांचे अनेक चेहरे दिसत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव आणि स्टाइल दिसत आहे. याच चेहऱ्यांमध्ये एक डॉगी लपला आहे. ज्याला तुम्हाला 5 सेकंदात शोधायचं आहे.

जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही लगेच यातील डॉगी शोधू शकाल. यात तुमचं मनोरंजन तर होईलच सोबत यातून तुमची आयक्यू टेस्टही होईल. जरी तुम्ही हे चॅलेंज पूर्ण करू शकले नाही तर निराश होण्याची गरज नाही. कारण यातील डॉगी शोधण्यात आम्ही तुमची मदत करू.

या फोटोतील डॉगी अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. त्याला फार हुशारीने यात लपवण्यात आलं आहे. जेणेकरून तुम्ही त्याला लगेच शोधू शकणार नाहीत. अनेकांना तर हे वाटतं की, यात डॉगी आहेच नाही. पण तुम्ही खालून दुसऱ्या लाईनमध्ये उजवीकडे बारकाईने बघाल तर तुम्हाला एक डॉगी चष्मा घातलेला दिसेल.


 

Web Title: Optical Illusion : Spot dog in these human faces online mind sharpness game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.