जास्तीत जास्त लोक फोटोतील वेगळं अक्षर शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 01:43 PM2024-10-24T13:43:25+5:302024-10-24T13:45:48+5:30

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला C या इंग्रजी अक्षराची गर्दी दिसत आहे. यात तुम्हाला एक वेगळं अक्षर शोधायचं आहे तेही 10 सेकंदात.

Optical illusion : Spot one odd letter hidden in sea of c in just 10 seconds | जास्तीत जास्त लोक फोटोतील वेगळं अक्षर शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हीही ट्राय करा!

जास्तीत जास्त लोक फोटोतील वेगळं अक्षर शोधण्यात झाले फेल, बघा तुम्हीही ट्राय करा!

Spot One Odd Hidden Letter: ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे केवळ मनोरंजनासाठी नाही तर तुमचा आयक्यू टेस्ट करण्यासाठीही ओळखले जातात. हे फोटो तुमच्या बुद्धी आणि डोळ्यांच्या क्षमतेला आव्हान देतात. तुम्हाला तुमच्यासमोर असलेल्या गोष्टी शोधण्यास सांगतात ज्या सामान्यपणे अनेकांना दिसत नाहीत. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला C या इंग्रजी अक्षराची गर्दी दिसत आहे. यात तुम्हाला एक वेगळं अक्षर शोधायचं आहे तेही 10 सेकंदात. हा केवळ एक खेळ नसून तुमच्या बुद्धीमत्तेची टेस्ट देखील आहे. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमची बुद्धी खूप तल्लख आहे आणि तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत तर चला लागा कामाला.

तुम्ही फोटोत बघू शकता की, फोटोत C अक्षराच्या कितीतरी लाईन्स आहेत. यातच एक वेगळं अक्षर लपवण्यात आलं आहे. असं मानलं जातं की, ज्या लोकांची बुद्धी सामान्यापेक्षा अधिक असते, ते अशा फोटोतील गोष्टी लगेच शोधतात.

जर तुम्ही फोटो बारकाईने बघितला तर तुम्हाला नक्कीच यातील वेगळं अक्षर शोधण्यात यश मिळेल. जर तुम्हाला ठरलेल्या वेळेत म्हणजे 8 सेकंदात यातील वेगळं अक्षर दिसलं असेल तर तुमचं अभिनंदन. तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण अजूनही दिसलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते कुठं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.

वरच्या फोटोत वेगळं अक्षर सर्कल केलं आहे.

Web Title: Optical illusion : Spot one odd letter hidden in sea of c in just 10 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.