चॅलेंज! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील नदीत लपलेली मगर, 99 टक्के लोक झाले फेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:51 PM2024-10-22T12:51:58+5:302024-10-22T12:56:01+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात.
(Image Source - The Sun)
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत असतात. कारण या फोटोंच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर होतंच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. कधी यात प्राणी किंवा वस्तू, कधी फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक जीव शोधायचा आहे. हा जीव म्हणजे मगर. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला अनेक गोष्टी दिसत आहेत. एक नदी आहे, काही झाडी आहेत आणि पाण्यात एक लाकूडही पडलेलं आहे. त्यात एक मगरही आहे. जी तुम्हाला शोधायची आहे. तुमचे डोळे जर तीक्ष्ण असतील तर तुम्ही मगरीला लगेच शोधू शकाल.
जर ठरलेल्या वेळेत म्हणजे 10 सेकंदात तुम्हाला पाण्यातील मगर दिसली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. तुमचं अभिनंदन. पण जर अजूनही तुम्हाला यातील मगर दिसली नसेल तर निराशही होऊ नका. कारण ती शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ती बघू शकता.
वरच्या फोटोत मगरीला सर्कल केलं आहे.