चॅलेंज! 4 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा इमोजी, ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 02:15 PM2024-09-24T14:15:45+5:302024-09-24T14:21:38+5:30
Optical Illusion : लोक कधी कधी यातील गोष्टी लगेच शोधतात, तर कधी त्यांना तासंतास वेळही लागतो. कारण हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आणि त्यांमधील रहस्य उलगडणं किंवा त्यातील गोष्टी शोधणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे कितीतरी फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. लोक कधी कधी यातील गोष्टी लगेच शोधतात, तर कधी त्यांना तासंतास वेळही लागतो. कारण हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा इमोजी शोधायचा आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायचे असतात. तर कधी यात काही फरक, वेगळे शब्द किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. मात्र, आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला खूपसारे एकसारखे इमोजी दिसत आहे. पण यात एक वेगळा इमोजी आहे. जो तुम्हाला ४ सेकंदात शोधायचा आहे.
जेव्हा असे एकसारख्या अनेक गोष्टी दिसणारे फोटो डोळ्यांसमोर येतात तेव्हा कन्फ्यूज व्हायला होतं. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाहीत. महत्वाची बाब म्हणजे अशा फोटोंच्या माध्यमातून तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळे लोकांना असे फोटो सॉल्व करणंही आवडतं.
जर तुम्हाला या फोटोतील वेगळा इमोजी दिसला असेल तर तुमचे डोळे खरंच खूप तीक्ष्ण आहेत. जर अजूनही सापडला नसेल तर निराशही होऊ नका. कारण तो काय आहे आणि कुठे आहे ते आम्ही दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तो तुम्ही बघू शकता.
वरच्या फोटोत वेगळा इमोजी सर्कल केला आहे.