तुमच्याकडे आहेत फक्त 20 सेकंद, शोधुन दाखवा या हत्तींच्या कळपात दडलेलं हार्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 09:42 PM2022-07-05T21:42:36+5:302022-07-05T21:46:41+5:30
या हत्तींच्या कळपात एक हृदय हरवलं आहे. हत्तींच्या कळपात लपलेलं हे हृदय शोधण्याचं चॅलेंज आहे (Find heart among elephants). यासाठी तुमच्याकडे फक्त 20 सेकंदाची वेळ आहे आणि यात तुम्ही यशस्वी झालात तर हा एक रेकॉर्डच आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओसोबत बरेच फोटो व्हायरल होत असतात. काही फोटोतून चॅलेंज दिलेलं असतं. सध्या असाच एक फोटो चर्चेत आहे. ज्यात बरेच हत्ती आहेत (Elephants optical illusion photo viral). या हत्तींच्या कळपात एक हृदय हरवलं आहे. हत्तींच्या कळपात लपलेलं हे हृदय शोधण्याचं चॅलेंज आहे (Find heart among elephants). यासाठी तुमच्याकडे फक्त 20 सेकंदाची वेळ आहे आणि यात तुम्ही यशस्वी झालात तर हा एक रेकॉर्डच आहे.
हत्ती सर्वात अवाढव्य प्राणी असे बरेच हत्ती एकत्र आले तर त्यांच्यातून काही शोधणं म्हणजे किती कठीण असू शकतं याचा अंदाजा तुम्हाला या फोटोतून येईल. फोटोत पाहू शकता शेकडो हत्ती यात आहेत. गुलाबी, पांढरे, जांभळ्या रंगाचे हे क्युट क्युट हत्ती. या क्युट पण भल्यामोठ्या हत्तींमध्ये एक छोटासा हृदय कुठे आहे ते शोधा. हृदय म्हणजे हार्टचा आकार आहे. ज्यांना आपल्या नजरेवर, डोळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. आपली दृष्टी शार्प आहे असं ज्यांना वाटतं. त्यांनी तर हे चॅलेंज घ्यायलाच हवं. हा फोटो म्हणजे त्यांना स्वतःच्या नजरेला सिद्ध कऱण्याचीसुद्धा एक संधी आहे.
काय मग पाहिलंत का फोटो नीट. सापडलं का तुम्हाला हार्ट. जर सापडलं तर उत्तमच नाही सापडलं तर आम्ही आहोतच तुमच्या मदतीला. तुम्ही हार्ट शोधलेलं असेल आणि तुम्ही जे शोधलं ते बरोबर आहे किंवा शोधलं नसेल तर हार्ट नेमकं आहे तरी कुठे हे पाहण्यासाठी आता खालील फोटो पाहा.
फोटोच्या वर डाव्या बाजूला पाहा. एक निळा आणि गुलाबी रंगाच्या हत्तीच्या मध्ये हा हार्ट आहे. वर आम्ही तुम्हाला जी जागा सांगितली तिथंच गुलाबी आणि निळा हत्ती एकमेकांना डोकं टेकवून आहेत. त्या दोघांच्या डोक्याच्या मधोमध एक छोटंसं गुलाबी रंगाचं हार्ट आहे.
दिसलं का? व्वा... चला तर मग आता या हत्तींमधील हार्ट शोधण्याचं चॅलेंज तुम्ही तुमचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य, मित्रमैत्रिणी किंवा तुम्हाला ज्याला कुणाला देण्याची इच्छा आहे, त्याला द्या आणि हो 20 सेकंदाची वेळ विसरू नका. पण हे चॅलेंज देण्यासाठी ही बातमी त्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा.